वन विभागाच्या इमारतीत भाजपाचे कार्यालय ृ

By admin | Published: June 22, 2014 11:59 PM2014-06-22T23:59:27+5:302014-06-22T23:59:27+5:30

शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही परवानगी न घेता खांबाडा गावाच्या वनविभागाच्या इमारतीत पक्ष कार्यालय थाटण्याचा प्रयत्न केला.

BJP office in forest department building | वन विभागाच्या इमारतीत भाजपाचे कार्यालय ृ

वन विभागाच्या इमारतीत भाजपाचे कार्यालय ृ

Next

दबंगगिरी : खांबाडा येथील कार्यकर्त्यांचा प्रताप
वरोरा : शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही परवानगी न घेता खांबाडा गावाच्या वनविभागाच्या इमारतीत पक्ष कार्यालय थाटण्याचा प्रयत्न केला. कार्यालयासाठी लागणारे साहित्य इमारतीत ठेवत इमारतीवर ‘भाजपा पक्ष कार्यालय’ असा फलक रंगविला जात असतानाच, वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन भाजपा कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या या दबंगगिरीची चर्चा खांबाडा परिसरात सुरू आहे.
वरोरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खांबाडा गावाच्या परिसरात नागपूर चंद्रपूर मार्गालगत वन विभागाची इमारत आहे. या इमारतीमध्ये वन विभागाच्यावतीने काही वर्षांपूर्वी वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यासाठी त्या इमारतीनजीक वायरलेस टॉवरची उभारलेली आहे. वाहनाची तपासणी करण्याचे काम बंद झाल्याने सदर इमारत वापरतो वन विभागाने बंद केले. इमारतीचा वापर होत नसल्याने कित्येक वर्षांपासून इमारत बंद अवस्थेत आहे. जागा मोक्याची आहे व राज्य मार्गाला लागून असल्याने या इमारतीवर भाजपा कार्यकर्त्यांचा डोळा होता. इमारतीमध्ये भाजपाचे कार्यालय थाटण्याकरिता वन विभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही व कार्यालयाकरिता लागणाऱ्या टेबल खुर्च्या आदी साहित्य इमारतीमध्ये नेऊन ठेवली. भाजपा कार्यकर्त्यांनी ईमारतीला रंगरंगोटी करुन घेतली. वन विभागाच्या इमारतीवर भाजपा कार्यालय खांबाडा असे फलक लावणे तेवढे बाकी होते. ही बाब वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, ते घटनास्थळावर त्वरित दाखल झाले व भाजपा कार्यकर्त्यांना वन विभागाची परवानगी पत्राची मागणी केली. परंतु भाजपा कार्यकर्त्यांनी परवानगी पत्र दिले नाही. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून साहित्य बाहेर काढण्यात सांगितले. परंतु साहित्य बाहेर काढले नाही. अखेर वन विभागाने इमारतीला कुलूप ठोकले. शासकीय इमारतीत विनापरवाना भाजपा कार्यालय उघडण्याच्या कार्यकर्त्यांच्या मनसुब्यावर विजरण पडले.
‘अच्चे दिन’ येणार असे सांगत केंद्रात भाजपा सरकार सत्तेवर आले. आणि त्याच पक्षाचे कार्यकर्ते शासकीय इमारतीत अतिक्रमणाचा प्रयत्न करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: BJP office in forest department building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.