भाजपाने नागरिकांची दिशाभूल करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:44 PM2017-11-06T23:44:12+5:302017-11-06T23:44:34+5:30

सध्या भाजपा सरकार काहीही बरळल्यासारखे विचित्र मुद्दे उपस्थित करून नागरिकांची अकारण दिशाभूल करीत आहे.

BJP should not mislead the citizens | भाजपाने नागरिकांची दिशाभूल करू नये

भाजपाने नागरिकांची दिशाभूल करू नये

Next
ठळक मुद्देसतीश चतुर्वेदी : नागपूर विभागीय शेतकरी-कामगार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या भाजपा सरकार काहीही बरळल्यासारखे विचित्र मुद्दे उपस्थित करून नागरिकांची अकारण दिशाभूल करीत आहे. एका सभेत भाषण देताना भाजपा नेत्याने महात्मा गांधींवर चार गोळ्या झाडल्या होत्या, असा नवाच जावईशोध लावला. म्हणे तीन गोळ्या नाथुराम गोडसे या झाडल्या आणि एक गोळी कुणी झाडली हे नागरिकांनी समजून घ्यावे. वास्तविक गांधी मर्डर केस आपला डी.लिट.चा विषय आहे. नाथुराम गोडसेने तीन गोळ्या झाडल्याचे कबूल केले होते आणि शवविच्छेदनातही तीनच गोळ्या निघाल्या. मग भाजपा सरकारने चौथी गोळी आणली कुठून, असा सवाल उपस्थित करून भाजपाने नागरिकांची दिशाभूल करू नये, असा निर्वाणीचा सल्ला काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी सरकारला दिला.
राष्टÑमाता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने येथील इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या पटांगणावर सोमवारी नागपूर विभागीय शेतकरी-कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर मेळाव्याचे आयोजक माजी खासदार नरेश पुगलिया तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनीस अहमद, आ. सुनिल केदार, माजी आमदार अशोक धवड, नागपूर मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, राहुल पुगलिया, गजानन गावंडे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार गेव्ह आवारी यांनीही भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. भाजपा सरकारची नोटबंदी ही सार्वजनिक लूट होती. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल, असे डॉ. मनमोहन सिंग यांनी नोटबंदीच्या निर्णयानंतर लगेच सांगितले होते. ते आता तंतोतंत खरे झाल्याचे सर्वांनाच दिसत आहे, असेही आवारी म्हणाले.
माजी खासदार नरेश पुगलिया म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणाले होते भारत काँग्रेसमुक्त करू. पण ते शक्य झाले नाही आणि होणारही नाही. मात्र येणाºया काळात देश भाजपामुक्त जरूर होईल. भाजपा सरकार त्याच दिशेने कारभार करीत आहे. मोदी उत्तम प्रशासक आहे, असे सांगितले जाते. असे असताना मग देशात मंदी का आहे, व्यापार नुकसानीत का आहे, शेतकरी आत्महत्या का वाढल्या आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी माजी मंत्री नितीन राऊत यांनी भाषणातून सरकारच्या धोरणावर कडाडून टिका केली. माजी मंत्री अनिस अहमद यांनी अंतर्गत वादावरच भाष्य केले. यावेळी आ. सुनिल केदार, माजी आमदार अशोक धवड यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक गजानन गावंडे, संचालन अविनाश ठावरी तर आभार तानाजी वनवे यांनी मानले.
रॅलीने शहर काँग्रेसमय
चंद्रपूर : मिरवणुकीच्या मध्यभागी खुल्या वाहनावर नागपूर विभागीय शेतकरी-कामगार मेळाव्याचे आयोजक माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, आमदार सुनील केदार, माजी आमदार अशोक धवड आरुढ झाले होते. रॅलीत विदर्भातील कार्यकर्त्यांचा सहभाग होता. सदर रॅलीच्या समोर दुचाकी चालकांची तर मागे शेकडो वाहनाचा ताफा विद्यानिकेतन शाळेच्या प्रांगणातून निघाला. ही रॅली वरोरा नाका, जटपुरा गेट, गांधी चौक मार्गांनी दाताळा रोडवरील इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या कार्यक्रमस्थळी पोहचली. तत्पूर्वी विद्यानिकेतन स्कूल परिसरातून रॅली काढण्यात आली. रॅलीचा प्रारंभ सोमवारी दुपारी ३.३० वाजता झाला. सदर रॅली जटपुरा गेट, गांधी चौक व इंदिरा गार्डन स्कूलमध्ये पोहचली. दरम्यान, हजारोंवर कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे शहरातील वातावरण काँग्रेसमय झाले होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी मनपा गट नेते डॉ. सुरेश महाकुलकर, गजानन गावंडे, विजय सिंह बैस, राकेश निकोसे, किशोर जीचकार, सुधाकर कुंदोजवार, गोदरू जुमनाके, कुणाल राऊत आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.

Web Title: BJP should not mislead the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.