चंद्रपूरचे आजी-माजी पालकमंत्री कर्नाटकच्या रणांगणात

By राजेश भोजेकर | Published: April 26, 2023 03:28 PM2023-04-26T15:28:08+5:302023-04-26T15:32:04+5:30

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी येत्या १० मे रोजी मतदान

BJP Sudhir mungantiwar and Congress Vijay Wadettiwar in Karnataka Election Campaign Battleground | चंद्रपूरचे आजी-माजी पालकमंत्री कर्नाटकच्या रणांगणात

चंद्रपूरचे आजी-माजी पालकमंत्री कर्नाटकच्या रणांगणात

googlenewsNext

चंद्रपूर : जिल्ह्याचे आजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी कर्नाटकच्या निवडणूक रणांगणात उडी घेतली आहे. मुनगंटीवार भाजप तर वडेट्टीवार हे काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. उल्लेखनीय, चंद्रपूर जिल्ह्याचे हे बडे नेते आपापल्या पक्षाचे स्टार प्रचारक बनले आहेत. 

राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बुधवारपासून विधानसभा निवडणूक प्रचारार्थ दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पक्षाच्या निर्देशानुसार ते विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी या मतदारसंघात ते दोन दिवस मुक्काम ठोकून प्रचाराला गती देणार आहेत. तर काँग्रेस नेते माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे मंगळवारपासूनच कर्नाटक राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. गोवा तथा महाराष्ट्राला लागून असलेल्या विधानसभा मतदार संघात ते काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे. मुनगंटीवार विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी विधानसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार सोमानगौडा पाटील यांच्या प्रचारासाठी २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता विजयपूर येथे दाखल झालेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तेथून देवर हिप्परगीकडे रवाना होतील. भाजपा उमेदवार सोमानगौडा पाटील यांची भेट घेऊन ते चर्चा करतील. त्यानंतर स्थानिक भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदार संघात विविध गावांमध्ये बैठका आणि जनसंपर्क अभियानात ते सहभागी होणार आहेत.

या दौऱ्यात जाहिर सभा सोबतच घरोघरी संपर्क, विविध समाजघटकांशी चर्चा व संपर्क, विविध व्यावसायिक घटकांशी संपर्क, बूथप्रमुख बैठका, भाजपा पक्षांतर्गत विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा अशा संघटनात्मक बाबींवरही जोर देण्यात आला आहे. या दौऱ्यात मुनगंटीवार यांच्यासोबत स्वतः उमेदवार सोमनगौडा पाटील यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी मंत्री व मतदारसंघ प्रभारी आनंद स्वरूप शुक्ला, मतदारसंघ निवडणुक प्रभारी अनिल जमादार, मंडल अध्यक्ष भीमणगौडा सिद्दार्थ, प्रभू गौडा बिरासदार, जिल्हा परिषद सदस्य सिद्दार्थ बुला आदी सहभागी होणार आहेत.

Web Title: BJP Sudhir mungantiwar and Congress Vijay Wadettiwar in Karnataka Election Campaign Battleground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.