भाजपा कामगार जिल्हाध्यक्षावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:30 PM2018-08-11T22:30:59+5:302018-08-11T22:31:17+5:30
येथील रहिवासी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश बोढेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास भद्रावती शहराच्या हद्दीत घडली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : येथील रहिवासी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश बोढेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास भद्रावती शहराच्या हद्दीत घडली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उमेश बोढेकर निवडणूक प्रचाराकरिता एमएच ३४ एएम ५४६७ क्रमाकाच्या वाहनाने भद्रावती येथे गेले होते. वरोराकडे जात असताना भद्रावतीकडून त्यांच्या मागून पांढऱ्या रंगाची कार आली. त्या कारने बोढेकर यांच्या गाडीला डाव्या बाजूचे इंडिकेटर लावून हात दाखविले. गाडी थांबवली असता तीन अज्ञात इसम उतरले. त्यातील एकाच्या हातात तलवार व तोंडाला पांढºया रंगाचा दुपट्टा बांधलेला होता. दोघांच्या हातात काठी होती. बोढेकर हे गाडीची काच अर्धी खाली करून हात ठेवून गाडीत बसून असताना त्यांच्या हातावर तलवारीने हल्ला केला. दरम्यान बोढेकर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे चमूसह बोढेकर यांच्यासोबत घटनास्थळी गेले, पण घटनास्थळ भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने भद्रावती पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध भादंवि कलम ३४१, ३२४, ४२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास तपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार व पोलीस निरीक्षक मडावी यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. बोढेकर यांच्यावर हल्ला होण्याची या वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात वरोरा शहरात हल्ला झाला होता.