वनमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी चंद्रपुरात भाजपचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:55 AM2021-02-28T04:55:31+5:302021-02-28T04:55:31+5:30

चंद्रपूर : पूजा चव्‍हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी ...

BJP's Chakkajam in Chandrapur for the resignation of the Forest Minister | वनमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी चंद्रपुरात भाजपचा चक्काजाम

वनमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी चंद्रपुरात भाजपचा चक्काजाम

Next

चंद्रपूर : पूजा चव्‍हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महानगरच्या वतीने शनिवारी चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महानगर व भाजपा महिला मोर्चा ग्रामीणतर्फे मूल रोड येथे सदर आंदोलन करण्यात आले.

यावेळी यवतमाळ शासकीय रुग्‍णालयातील वरिष्‍ठ पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाचा तपास करावा, अशी मागणीही करण्यात आली. सदर आंदोलन भाजपा महिला मोर्चा महानगराच्‍या अध्‍यक्षा अंजली घोटेकर, महिला मोर्चा ग्रामीण अध्‍यक्षा अलका आत्राम यांच्‍या नेतृत्‍वात जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, महाराष्‍ट्र प्रदेश उपाध्‍यक्षा वनिता कानडे यांच्‍या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी मूल येथील नगराध्‍यक्षा रत्‍नमाला भोयर, प्रदेश कार्यकारिणी सदस्‍य रेणुका दुधे, महिला व बालकल्‍याण सभापती रोशनी शेख, चंद्रपूर पंचायत समितीच्‍या सभापती केमा रायपुरे, माजी नगराध्‍यक्ष श्‍वेता वनकर, रजिया कुरैशी, महामंत्री शीला चव्‍हाण, उपाध्‍यक्षा किरण बुटले, नगरसेविका वंदना तिखे, सचिव सिंधू राजगुरे, महामंत्री सायरा शेख, संजीवनी वाघरे, कल्‍पना पोलोजवार, अर्चना चावरे, कांता ढोके, सुजाता मॅकलवार, अनिता भोयर, वनिता आसुटकर, वैशाली जोशी, आरती आक्‍केवार व न अनेक महिला उपस्थित होत्‍या. आंदोलनानंतर प्रशासनासह लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले.

Web Title: BJP's Chakkajam in Chandrapur for the resignation of the Forest Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.