भाजपकडून जातकारणाचे विष पेरण्याचा केविलवाणा प्रयत्न; कटकारस्थानांचा तीळमात्र फरक पडणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 02:34 PM2024-11-07T14:34:35+5:302024-11-07T14:37:44+5:30
वडेट्टीवार यांचा आरोप : सावली येथे कार्यकर्ता बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : ब्रह्मपुरी मतदार संघात भाजपकडून जातकारणाचे विष पेरण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू आहे. या क्षेत्रात सर्वधर्मसमभाव सर्व समाज बांधवांना समान न्याय वागणूक देणारा लोकप्रतिनिधी, अशी माझी ओळख आहे. मला अशा कटकारस्थानांचा तीळमात्र ही फरक पडणार नाही असे आव्हान विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना दिले.
सावली तालुक्यातील हिरापूर येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते ते म्हणाले, माझा कार्यकर्ता माझ्या पक्षाची रक्तवाहिनी असून माझी काँग्रेसची फळी अतुट बांधल्या गेली आहे. येणाऱ्या निवडणुकीत माझ्यावर राज्याच्या निवडणुकीची मोठी जबाबदारी असल्याने आपण खुद्द माझा बूथ माझी जबाबदारी व मीच उमेदवार या मूलमंत्राने जोमाने काम करा. असे आवाहन त्यांनी केले.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात समृद्धी शेतीसाठी गोसेखुर्द व घोडाझरी धरणाचे पाणी पोहोचविले. शुद्ध पेयजनासाठी गावोगावी पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. रस्ते, सामाजिक सभागृहे, वाचनालये ग्रामपंचायत भवन, प्रशासकीय कार्यालयासाठी प्रशस्त इमारती, आरोग्य केंद्रांसाठी प्रशस्ती इमारती, रुग्णवाहिका, बस स्थानक, अशा अनेक सुविधांसाठी कोट्यावधींचा निधी शासन स्तरावरून खेचून आणला याकडे लक्ष वेधले. यावेळी मार्गदर्शनपर बोलताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनीही उमार्गदर्शन केले. प्रास्ताविक काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन गोहणे, सूत्रसंचालन सचिन शेंडे यांनी केले. बैठकीला पांडुरंग पा. तांगडे, राजेश सिद्धम, प्रशांत गाडेवार उषा भोयर, राकेश गड्डमवार, अवधूत कोठेवार, विजय कोरेवार, विजय मुत्यालवार, लता लाकडे, मुन्ना स्वामी, किशोर कारडे, पुरुषोत्तम चुधरी, मनोहर ठाकरे, गोपाल रायपुरे, कृष्णा राऊत, यशवंत ताडाम, रोशन बोरकर, नितिन दुव्वावार, अमरदिप कोनपत्तीवार तसेच सावली तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, बूथ प्रमुख तथा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.