सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटतर्फे भाजपाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:16 AM2018-11-14T01:16:45+5:302018-11-14T01:18:29+5:30

मोदी सरकारने आरबीआयकडे ३६ हजार कोटी रुपयांची मागणी केल्याच्या विरोधात सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारचा निषेध करुन निषेधपत्राचे वितरण करण्यात आले.

BJP's protest by Self-Rescind Movement | सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटतर्फे भाजपाचा निषेध

सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटतर्फे भाजपाचा निषेध

Next
ठळक मुद्देनागरिकांना निषेधपत्राचे वितरण : कर्ज घेण्यास विरोध, सरकारची आश्वासने फोल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मोदी सरकारने आरबीआयकडे ३६ हजार कोटी रुपयांची मागणी केल्याच्या विरोधात सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारचा निषेध करुन निषेधपत्राचे वितरण करण्यात आले.
केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. सत्तेमध्ये येण्यापूर्वी भाजप सरकारने अनेक आमिष दाखविले. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना जनतेला दिलेल्या आमिषांचा विसर पडला. नोटाबंदी करुन जनसामान्यांना सरकारने वेठीस धरले. तसेच जीएसटीमुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांंना आर्थिक भुर्दंड बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ केली. तसेच सिलिंडरच्या किंमतीमध्ये प्रचंढ वाढ केली. परिणामी महिलांचे बजेट कोलमडले आहे. नोकरभरतीवर बंदी लादली आहे. आता तर थेट आरबीयकडे ३६ हजार करोड रुपयांची मागणी करीत आहे. तसेच जागतिक बँकेकडून दहा लाख कोटींचे कर्ज काढून देशाला जागतिक बँकेकडे गहाण ठेवले आहे. आरबीयच्या राखीव निधीतील पैसे लुटण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत असल्याचा आरोपही करीत भाजपाचा निषेध करण्यात आला. यावेळी विविध प्रकारची घोषणाबाजी करुन दोन हजारच्या जवळपास निषेधपत्रकांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्य संघटक बळीराज धोटे, हिराचंदजी बोरकुटे, संघटक भास्करराव मुन, इंजि सुर्यभान झाडे, प्रा. माधव गुरनुले, डॉ. बाळकृष्ण भगत, योगेश आपटे, संतोष दोरखंडे, अशोक मेश्राम, दिलीप होरे, भिवराज सोनी, दिलीप तेलंग, बबन कृष्णापुरकर, झुरमुरे, बल्की, दिलीप आक्केवार आदी उपस्थित होते.

विविध संघटनांचा पाठिंबा
गांधी चौकात सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटतर्फे पार पडलेल्या आंदोलनात विविध संघटनाही सहभागी झाल्या होत्या. नारेबाजी करुन निषेध करण्यात आला.

Web Title: BJP's protest by Self-Rescind Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा