Chandrapur Mayor: भाजपाच्या संगीता खांडेकर अखेर चंद्रपूरच्या महापौरपदी, काँग्रेसवर अवघ्या एका मताने केली मात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:24 IST2026-02-10T12:12:52+5:302026-02-10T12:24:32+5:30

Chandrapur Mayor Election 2026: अनेक नाट्यमय घडामोडी आणि वादविवादांमुळे चर्चेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अखेर भाजपाचा महापौर विराजमान झाला आहे. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर अवघ्या एका मताने मात करत बाजी मारली. 

BJP's Sangeeta Khandekar finally becomes Chandrapur Mayor, defeating Congress by just one vote | Chandrapur Mayor: भाजपाच्या संगीता खांडेकर अखेर चंद्रपूरच्या महापौरपदी, काँग्रेसवर अवघ्या एका मताने केली मात  

Chandrapur Mayor: भाजपाच्या संगीता खांडेकर अखेर चंद्रपूरच्या महापौरपदी, काँग्रेसवर अवघ्या एका मताने केली मात  

अनेक नाट्यमय घडामोडी आणि वादविवादांमुळे चर्चेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अखेर भाजपाचामहापौर विराजमान झाला आहे. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर अवघ्या एका मताने मात करत बाजी मारली. एकूण ६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा ३२ पर्यंत खाली आला. त्यात  जपच्या संगीता खांडेकर या ३२ मते घेऊन विजयी झाल्या. तर ३१ मते मिळवणाऱ्या काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत मागच्या वेळचा सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाचा पराभव झाला होता. तर काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. ६६ जागा असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसने २७, भाजपाने २३, उद्धवसेनेने ६, शेकापने ३, वंचितने २, अपक्ष २, बसपाने १, शिंदेसेनेने १ आणि एमआयएमने १ जागा जिंकली होती.

मात्र  कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता न आल्याने महानगरपालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. तसेच ६ नगरसेवकांसह उद्धवसेना किंगमेकरच्या भूमिकेत होती. मात्र निकाल लागल्यापासून काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या गटामध्ये सत्तासंघर्ष सुरू होऊन वाद विकोपाला गेला. त्यावर अखेरपर्यंत तोडगा न निघाल्याने आणि उद्धवसेना महापौरपदावर अडून बसल्याने काँग्रेसच्या हातून सत्तास्थापनेची संधी हुकली.

अखेरीस आज महापौरपदाच्या निवडणुकीदिवशी उद्धवसेना आणि भाजपामध्ये महापौरपदावरून तडजोड झाली . तसेच प्रत्येकी सव्वा वर्षांसाठी महापौर निवडण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला. या फॉर्म्युल्यानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी भाजपाच्या संगीता खांडेकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं. तसेच उपमहापौरपद उद्धवसेनेला देण्यात आलं.

दरम्यान आज महापौर निवडणुकीआधी भाजपाने आपल्या उमेदवारासाठी अधिकृत व्हीप जारी करत आक्रमक भूमिका घेतली होती. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिस्तबद्ध मतदानाची रणनीती आखली. दुसरीकडे काँग्रेसकडून उद्धवसेनेला सोबत घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र महापौरपदावर ठाम असलेल्या उद्धवसेनेने मंगळवारी (१० फेब्रुवारी) आमदार किशोर जोरगेवार यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत अखेर उपमहापौरपद स्वीकारत सत्ता समझोत्याला हिरवा कंदील दिला.

 

Web Title : भाजपा की संगीता खांडेकर चंद्रपुर की महापौर निर्वाचित, कांग्रेस को हराया

Web Summary : नाटकीय घटनाओं के बीच, भाजपा की संगीता खांडेकर चंद्रपुर महानगरपालिका की महापौर निर्वाचित हुई हैं। उन्होंने आज महापौर चुनाव में कांग्रेस उम्मीदवार को एक वोट से हराया, भाजपा के लिए जीत सुनिश्चित की।

Web Title : BJP's Sangeeta Khandekar Elected Chandrapur Mayor, Narrowly Defeats Congress

Web Summary : Amidst dramatic events, BJP's Sangeeta Khandekar has been elected as the Mayor of Chandrapur Municipal Corporation. She narrowly defeated the Congress candidate by a single vote in today's mayoral election, securing the victory for the BJP.