कुचना-माजरी परिसरात चालतो अवैध सट्टापट्टीचा काळा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:12+5:302021-08-17T04:33:12+5:30
बेरोजगार युवकांना नैराशेतून सट्टाचे वेड पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष की राजकीय अभय कुचना : माजरी परिसरात कोळसा खाणी आहेत. काळे ...
बेरोजगार युवकांना नैराशेतून सट्टाचे वेड
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष की राजकीय अभय
कुचना : माजरी परिसरात कोळसा खाणी आहेत. काळे सोने उगविणाऱ्या उद्योगधंद्याचा परिसर आर्थिकदृष्ट्या व रोजगाराच्या दृष्टीने सधन म्हणून ओळखल्या जाते. कामधंद्यासाठी परराज्यातील खूप लोक इथे स्थायिक होऊन व्यवसाय करतात. अवैध सट्टापट्टीचा काळाबाजारही तेजीत आहे.
पळसगाव, कुचना, पाटाळा, नागलोन, मणगाव, माजरी-कॉलरी, चालबर्डी या भागातील शेतीत कापूस आणि सोयाबीन या नगदी पिकांचे क्षेत्र वाढल्याने ग्रामीण भागसुद्धा बराच पैश्यापाण्याने प्रगत आहे. याचमुळे आता या परिसरात अवैध धंद्यांना उत आलेला आहे. रेतीतस्करी, सट्टापट्टी, भंगारचोरी यामुळे अल्पावधित काही लोकांनी गडगंज पैसे कमाविले. आता या क्षेत्रात यांची चांगलीच पकड निर्माण झाली आहे. अगदी लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवाच चालू होत्या. अन्य व्यवसाय बंद होते. अर्ध बंद दरवाजाच्या आड सट्टा व्यवसाय चालू असताना कधीही कारवाही झाली नाही. त्यामुळे प्रशासनाची मूक मान्यता आहे की काय? असा प्रश्न स्थानिक जनतेला पडला आहे. आता या सट्ट्याच्या नादाला ग्रामीण भागातील युवक आणि पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात लागला आहे. रोजच आता इथे गर्दी होते सट्टा दुकान हे मागच्या दाराने किंवा अर्धबंद दरवाजा उघडून नाहीतर मोबाइल फोनद्वारे, व्हाॅट्सॲपद्वारे हा व्यवसाय जोरात चालत आहे.