दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 06:00 AM2020-06-13T06:00:00+5:302020-06-13T06:00:02+5:30

कागदोपत्री कामाचा पाठपुरावा न करता संंबधित कामे पूर्णत्वास नेण्यासंदर्भात अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजने अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांची माहिती, लसीकरण, जननी सुरक्षा योजना व प्रधानमंत्री मातृ वंदना योजनांंसंदर्भातील कामाचा आढावा त्यांनी घेतला.

Blacklist contractors who delay | दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका

दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका

googlenewsNext
ठळक मुद्देभद्रावती पंचायत समितीचा आढावा सभा : कामात गती आणण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पंचायत समितीस्तरावरून सिंचाई विभागाच्या वतीने सुरू असलेले काम त्वरित पूर्ण करा, रखडलेल्या कामामध्ये हयगय करणाºया संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे निर्देश देवून अधिकाऱ्यांनीही आपल्या कामामध्ये गती आणण्याचे आवाहन भद्रावती पंचायत समितीमध्ये पार पडलेल्या आढावा सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी केले.
कागदोपत्री कामाचा पाठपुरावा न करता संंबधित कामे पूर्णत्वास नेण्यासंदर्भात अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजने अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांची माहिती, लसीकरण, जननी सुरक्षा योजना व प्रधानमंत्री मातृ वंदना योजनांंसंदर्भातील कामाचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष रेखा कारेकर, अर्थ व बांधकाम सभापती राजूभाऊ गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकुडे, महिला व बालकल्याण सभापती नीतु चौधरी, पं.स. सभापती प्रविण ठेंगणे, जि प. सदस्य यशवंत वाघ, प्रविण सूर, संवर्ग विकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, सहायक संवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, प्र. कार्यकारी अभियंता (सिंचाई) अशोक पिदुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय आसूटकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे, गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, उपअभियंता (बां.) दोरखंडे, उपअभियंता इंगळे, कृषी अधिकारी रणदिवे आदी उपस्थित होते.

Web Title: Blacklist contractors who delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.