चंद्रपूर वनवृत्तातर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:28 AM2021-04-08T04:28:27+5:302021-04-08T04:28:27+5:30
चंद्रपूर : कोरोनामुळे रक्तसाठा कमी पडत असल्याने वनवृत्त चंद्रपूर आणि जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य ...
चंद्रपूर : कोरोनामुळे रक्तसाठा कमी पडत असल्याने वनवृत्त चंद्रपूर आणि जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य वनरक्षक कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्या हस्ते पार पडले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे वनवृत्त चंद्रपूरतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मध्य चांदाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, वनरक्षक अमित चहांडे, सोनाली शिरसाठ, विजय रामटेके, महेंद्र पाटील, संतोष औटकर, सहाय्यक वनसंरक्षक प्रितमसिंह कोडापे, वनपाल नरेश भोवरे, वनरक्षक भूषण गोधने, सुदेश घरजारे, संदीप तुपट यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी रक्तदान केले.