जिल्हा बार अधिवक्ता संघातर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:19+5:302021-06-03T04:20:19+5:30

चंद्रपूर : कोरोनामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होत असल्याने ‘मानवता ही सेवा अधिवक्ता संघ’ व चंद्रपूर जिल्हा बार अधिवक्ता संघातर्फे ...

Blood donation camp by District Bar Advocates Association | जिल्हा बार अधिवक्ता संघातर्फे रक्तदान शिबिर

जिल्हा बार अधिवक्ता संघातर्फे रक्तदान शिबिर

Next

चंद्रपूर : कोरोनामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होत असल्याने ‘मानवता ही सेवा अधिवक्ता संघ’ व चंद्रपूर जिल्हा बार अधिवक्ता संघातर्फे स्थानिक आयएमए सभागृहात बुधवारी रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात अधिवक्ता संघाच्या पदाधिकाऱ्यांसह ३० जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्याच्या सगळ्या शासकीय रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात रुग्णांना भरती करण्यात आले. त्यातच रक्तदान शिबिराचे आयोजन होत नसल्याचे रक्ताचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे अधिवक्ता संघातर्फे हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना चंद्रपूर शासकीय रुग्णालय रक्तदान विभागातर्फे प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. ॲड. आशिष मुंधडा यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी चंद्रपूर जिल्हा बार संघाचे सचिव ॲड. संदीप नागपुरे, ॲड. अभय पाचपोर, ॲड. आशिष धर्मपुरीवार, ॲड. इंदर पुगलिया, ॲड. विनय लिंगे, ॲड. राजेश ठाकूर, ॲड. नितीन गटकीने, ॲड. राजेश जुनारकर, ॲड. निलेश दलपेलवार, ॲड. सचिन उमरे, ॲड. भूषण वांढरे, ॲड. प्रदीप क्षीरसागर, ॲड. मनोज मांदाडे, ॲड. किरण पाल, ॲड. लालजी जेम्स, ॲड. किरण आवारी, ॲड. जय पंजाबी, ॲड. अशोक चकरापुरवार, ॲड. पुंडलिक देवतळे, ॲड. तबस्सुम आयुब शेख, ॲड. तृप्ती मांडवगडे, ॲड. देवराव धोडरे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation camp by District Bar Advocates Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.