चंद्रपुरात आज महारक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:49+5:302021-07-02T04:19:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : काेरोनामुळे महाराष्ट्रासह देशभरात रक्ताची मागणी प्रचंड वाढली आहे. रक्तदानातून ही चणचण दूर करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : काेरोनामुळे महाराष्ट्रासह देशभरात रक्ताची मागणी प्रचंड वाढली आहे. रक्तदानातून ही चणचण दूर करण्यात मोलाचा हातभार लागावा, या हेतूने लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्ताने ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही रक्तदानाची भव्य मोहीम राज्यभरात हाती घेतली आहे. चंद्रपुरात शुक्रवारी २ जुलै रोजी बाबूजी यांची जयंती व डाॅक्टर्स डेनिमित्त या मोहिमेचा भव्य शुभारंभ इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृह, गंजवाॅर्ड चंद्रपूर येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकारात जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन रेडक्राॅस सोसायटी व सोमय्या पाॅलिटेक्निक चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदानाच्या या महायज्ञात रक्तदान करण्यासाठी शहरातील रक्तदात्यांसह विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनी आपली नोंदणी केलेली आहे. हे शिबिर दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रत्येकाने रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९८५०३०४१४७, ७५७०३१०४१४ .
रक्तदान शिबिर : २ जुलै २०२१
स्थळ : आयएमए सभागृह, सरदार पटेल महाविद्यालयाच्या बाजूला चंद्रपूर,
वेळ : सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत.