चिंतामणी महाविद्यालयात रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:23 AM2020-12-25T04:23:13+5:302020-12-25T04:23:13+5:30
घोसरी : चिंतामणी काॅलेज ऑफ काॅमर्स चिंतामणी महाविद्यालय व चिंतामणी काॅलेज ऑफ सायन्स या तीनही महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना ...
घोसरी : चिंतामणी काॅलेज ऑफ काॅमर्स चिंतामणी महाविद्यालय व चिंतामणी काॅलेज ऑफ सायन्स या तीनही महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा स्मृतीदिननिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. प्राचार्य डाॅ. टी. एफ. गुल्हाने, प्राचार्य डाॅ. एन. एच. पठाण, प्रभारी प्राचार्य डाॅ. सुधीर हुंगे यांनी संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पुजन करून शिबिराचे उद्घाटन केले. शिबिरासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर, अधीक्षक पंकज पवार, तंत्रज्ञ अपर्णा रामटेके, साबीर शेख, पुनम कोवे, लक्ष्मण नगराळे व रूपेश घुमे यांनी सहकार्य केले. संघपाल नारनवरे, सतिश पीसे, शैलेंद्र गिरीपुंजे, विठ्ठल चौधरी, ओमप्रकाश सोनोने, नितीन उपर्वट, सुधीर हुंगे, संतोषकुमार शर्मा, बाळासाहेब कल्याणकर, दिलीप विरूटकर, चंद्रकांत वासेकर, अजय बोमकंटीवार, पराग बोमकंटीवार, रितीक गोनलवार, विवेक इटेकर, श्रीकांत शेंडे, प्रदिप कोडापे, सावन बासनवार, हर्षल गयके आदींनी रक्तदान केले. यशस्वीततेसाठी डाॅ. संघपाल नारनवरे, प्रा. धर्मादास घोडेस्वार, प्रा. नितीन उपर्वट व डाॅ. पाठक या रासेयो कार्यक्रम अधिकाऱ्यांसह समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.