मनपा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:45+5:302021-09-09T04:34:45+5:30

चंद्रपूर : महानगरपालिकेच्यावतीने मुख्य प्रशासकीय इमारतीत बुधवारी रक्तदान शिबिरात अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्यासह विविध विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी ...

Blood donation of employees including corporation officials | मनपा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे रक्तदान

मनपा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे रक्तदान

Next

चंद्रपूर : महानगरपालिकेच्यावतीने मुख्य प्रशासकीय इमारतीत बुधवारी रक्तदान शिबिरात अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्यासह विविध विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच डेंग्यू व मलेरिया आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने मनपा कार्यक्षेत्रात सप्टेंबर महिन्यात दर आठवड्यात चार रक्तदान शिबिर होणार आहेत.

बुधवारी महानगरपालिका कार्यालय मुख्य इमारत गांधी चौक येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात मुख्य प्रशासकीय कार्यालयातील सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनीही रक्तदान करून सर्वानी रक्तदान करावे, असे आवाहन केले. यावेळी मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, शहर कार्यक्रम व्यवस्थापक नरेंद्र जनबंधू, डॉ. अतुल चटकी यांच्यासह मनपा आरोग्य विभागाची चमू आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. रक्तदात्यांना राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुढील आठवड्यात १४ सप्टेंबर २०२१ सकाळी १० वाजता मनपा झोन कार्यालय क्र. १ संजय गांधी मार्केट नागपूर रोड येथे,२१ सप्टेंबर २०२१ रोजी मनपा झोन कार्यालय क्र. २ सात मजली इमारत येथे, २८ सप्टेंबर २०२१ रोजी मनपा झोन कार्यालय क्र. ३ बंगाली कॅम्प मूल रोड येथे रक्तदान शिबिर होणार आहे. शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.

Web Title: Blood donation of employees including corporation officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.