कोरपना, गोडपिपरी, भिसीमध्ये रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:00 AM2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:42+5:30
युवा प्रतिष्ठान, ब्रदर्स ऑन ड्युटी, श्रीराम सेवा समिती व कोरपना येथील नागरिकांच्या वतीने येथील वसंतराव नाईक विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन कतरण्यात आले होते. यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: आरोग्य मंत्र्यांनी रक्तदान करण्यासंदर्भात आवाहन केल्यानंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
कोरपना येथे २५ जणांचे रक्तदान
कोरपना: युवा प्रतिष्ठान, ब्रदर्स ऑन ड्युटी, श्रीराम सेवा समिती व कोरपना येथील नागरिकांच्या वतीने येथील वसंतराव नाईक विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन कतरण्यात आले होते. यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला राज्य रक्तसंक्रमण परिषद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरची चमू, वैद्यकीय अधिकारी नितीन चौधरी, पंकज पवार, रक्तपेढी तंत्रज्ञ जयवंत पचारे, सोमनाथ बेलकुडे, संजय विश्वास, रुपेश घुमे, गोविंदा पेंदाम आदी उपस्थित होते.
भिसीमध्ये १४० जणांनी केले रक्तदान
भिसी : बजरंग दल शाखा भिसी व लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम नवमीच्या पर्वावर विठ्ठल रूख्मिनी सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी १४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी बजरंगदल भिसीचे संयोजक प्रेमदास कामडी, श्रीराम धोंगडे, सचिन चिंचुलकर, अंकुश धांडे, भुषण साठोने, विनोद नागपूरे, प्रणित डूकरे, आकाश रामटेके, आदित्य बुजाडे, अनिकेत कामडी, अमोल आंबटकर, गणेश मुंगले, वैभव डोंगरे, गौरव नंदुरकर यांच्यासह सदस्य तसेच नागरिकांनी परिश्रम घेतले.
ओबीसी युवा मंच, गोंडपिपरी
गोंडपिपरी : ओबीसी युवा मंचच्या वतीने धनोजे कुणबी समाज सभागृह गोंडपिपरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. ठाणेदार संदीप धोबे यांच्या हस्ते प्रथम रक्तदान करणाऱ्या युवकाला गुलाबपुष्प देऊन रक्तदान शिबिराची सुरुवात केली. आयोजनासाठी प्रा. तेजराज पाटील, डॉ. संजय लोहे, डॉ. नितेश पावडे, गणेश पिंपळकर, डॉ. प्रा. अशोक कूळे, श्री गुरुदेव बाबनवाडे, सुनील फलके, प्रा. संतोष बांदूरकर, दुष्यांत निमकर, अरुण झगडकर, गणेश पिंपळकर, अतुल जम्पलवार, प्रा.रमेश हुंलके, अनिल सूरकर आदींनी परिश्रम घेतले.