रक्ताचे नातेही गोठले, स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:27 AM2021-05-24T04:27:19+5:302021-05-24T04:27:19+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दररोज २५ ते ३० बाधितांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. या मृतकांवर चंद्रपूर पठाणपुरा गेटबाहेरील स्मशानभूमीत करण्यात येत ...
चंद्रपूर जिल्ह्यात दररोज २५ ते ३० बाधितांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. या मृतकांवर चंद्रपूर पठाणपुरा गेटबाहेरील स्मशानभूमीत करण्यात येत आहे. कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर मनपाचे त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात येते. परंतु, काही नातेवाईक तुम्हीच अंतिम संस्कार उरकून घेण्याचा सल्ला देत असल्याचेही सामोर आले आहे तर काही नातेवाईक अंतिम संस्कारासाठी येतात. मनपा कर्मचारी मृतदेह स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात. यावेळी नातेवाइक उपस्थित असले तर त्यांच्यातर्फे अग्नी देण्यात येतो. संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सकाळी ७ वाजेपर्यंत नातेवाईकांना अस्थी देण्यात येतो. परंतु, बरेच नातेवाईक अस्थी नेण्यासाठी येतच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दररोज गोळा झालेल्या राखेचे करायचे काय, असा प्रश्न स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.
बॉक्स
अस्थींचे करायचे काय
चंद्रपूर येथील पठाणपुरा गेटबाहेरील स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येते. दररोज १५ ते २० मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात येतो. काही नातेवाईक दुसऱ्या दिवशी अस्थी घेऊन जात असतात तर बहुतेकांचे नातेवाहिक अस्थी नेण्यासाठी येतच नाही. त्यामुळे एवढ्यासारख्या अस्थींचे करायचे काय, असा प्रश्न स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.
बॉक्स
राखेची विल्हेवाट तुम्हीच लावा
कोट
अंतिम संस्कार झाल्यानंतर नातेवाईकांना सकाळी सात वाजताच्या आत येऊन अस्थी नेण्याबाबत सांगतो. काही नातेवाईक नेण्यासाठी येतात तर बहुतेकजण येतच नसल्याचे अनेकदा बघायला मिळाले आहे.
- कर्मचारी
--------
बहुतेक मृताचे नातेवाईक अंतिम संस्कारासाठी येतच नाही. त्याची पूर्ण विधी आम्हीच पार पाडत असतो. त्यामुळे त्या अस्थी नेण्याचा विषयच येत नाही. त्यामुळे ती अस्थी सध्यातरी येथेच ठेवण्यात आली आहे.
-कर्मचारी
-----
अस्थिविसर्जन झाल्यानंतर नातेवाईकांना अस्थिंसंदर्भात विचारताच तुम्हीच अस्थीची विल्हेवाट लावा, असा सल्ला आम्हाला दिला जातो. दुसऱ्या दिवशी साधी अस्थीचे काय केले, हे विचारणा करण्यासाठीसुद्धा नातेवाईक येत नाही.
-कर्मचारी