नात्यातच घडला रक्तसंहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:34+5:302021-03-04T04:54:34+5:30
चकलोहारात मुलाने केला वडिलाचा खून शंकरपूर येथून जवळच असलेल्या चकलोहारा येथे मुलाने वडिलावर काठीने हल्ला करून खून केल्याची घटना ...
चकलोहारात मुलाने केला वडिलाचा खून
शंकरपूर येथून जवळच असलेल्या चकलोहारा येथे मुलाने वडिलावर काठीने हल्ला करून खून केल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. सिद्धार्थ सवाईकर (५५) तर मुलगा सुखदेव सिद्धार्थ सवाईकर (२०) यांच्यामध्ये घरीच शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात मुलगा सुखदेव याने वडिलांच्या डोक्यावर काठीने प्रहार करून गंभीररीत्या जखमी केले. त्याला शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. तिथे मृत घोषित करण्यात आले. घटनेनंतर सुखदेव याने वडील चक्कर येऊन पडले आणि त्यात ते जखमी झाल्याचे रुग्णालयात सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी पोस्टमार्टम न करता मृतदेह घेऊन जाण्यास परवानगी दिली. परंतु याबाबतची सविस्तर माहिती शंकरपूर पोलीस चौकीला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. या चौकशीत खून झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी पुन्हा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला व आरोपी सुखदेव सवाईकर याला अटक केली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक नितीन बघाटे, भिसीचे ठाणेदार मनोज गभने यांनी भेट दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे करीत आहे.