मतदार याद्यांतील घोळामुळे निरूत्साह

By admin | Published: February 17, 2017 01:04 AM2017-02-17T01:04:58+5:302017-02-17T01:04:58+5:30

मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडे असलेल्या यादीत अनेक मतदारांचे नाव व क्रमांक मतदानाच्या सुरूवातील सापडत नव्हते.

Blues in voter lists | मतदार याद्यांतील घोळामुळे निरूत्साह

मतदार याद्यांतील घोळामुळे निरूत्साह

Next

काही काळ मतदान प्रभावित : वरोरा, बल्लारपूर, नागभीड आदी तालुक्यांतील प्रकार

वरोरा : मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडे असलेल्या यादीत अनेक मतदारांचे नाव व क्रमांक मतदानाच्या सुरूवातील सापडत नव्हते. उमेदवार प्रतिनिधी जवळून घेतलेला चिठ्ठीतील मतदानाचा क्रमांक व नाव मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडे सापडत नव्हते. यामुळे अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने अनेक केंद्रावर मतदान काही काळासाठी प्रभावित झाल्याचे वरोरा तालुक्यात दिसून आले.
मतदान केंद्र अधिकाऱ्याकडे निवडणूक विभागातर्फे एक मतदार यादी दिली असते. मतदार मतदानाला मतदान केंद्रात गेल्यानंतर मतदाराचे नाव व क्रमांक वाचला जातो. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया ओळख बघून सुरु होते. मतदार आपले नाव बाहेरील यादीत शोधून त्याचा क्रमांक घेवून मतदानाकरिता जात होते. मात्र घेऊन गेलेला क्रमांक व मतदाराचे नाव अनेक मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे सापडत नव्हते. त्यामुळे अशा मतदारांना सकाळी थांबविण्यात आले होते. परंतु दररोज मजुरी करणारा वर्ग मतदानात वेळ लागणार असल्याने आपली मजुरी जाणार या भितीने मतदान केले नाही व निघून गेल्याची माहिती अनेक उपस्थित उमेदवार प्रतिनिधी दिली.
बीएलओच्या मतदान चिठ्या अनेक ठिकाणी पोहोचल्या नाही. बीएलओ बुथ लेवल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मतदारांना मतदार क्रमांक, मतदाराचे नाव तसेच मतदान केंद्राचे नाव व क्रमांक असलेल्या चिठ्ठ्या मागील काही निवडणुकीपासून देण्यात येते.
हे काम स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडे सोपविले जाते. परंतु या जि.प. व पं.स. निवडणुकीत आजच्या मतदानाच्या दिवसापूर्वी अनेक मतदारांपर्यंत चिठ्या पोहोचल्या नाही, त्यामुळे हा घोळ आज अनेक मतदान केंद्रावर सुरु दिसून आला. प्रमाणित मतदार यादी उमेदवारांजवळ का देण्यात आली नाही. या प्रश्नांचे उत्तर सध्यातरी अनुत्तरीय आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Blues in voter lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.