बोगस बियाण्यांमुळे कपाशी करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:09 AM2017-10-27T00:09:55+5:302017-10-27T00:10:07+5:30

शक्ती प्लस ही बियाणे वापरल्याने कपाशीचे पीक करपले, अशी तक्रार बिबी येथील शेतकºयाने पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली आहे.

Bogass seeds cause cauliflower | बोगस बियाण्यांमुळे कपाशी करपली

बोगस बियाण्यांमुळे कपाशी करपली

Next
ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान : शेतकºयांची कृषी विभागाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदाफाटा : शक्ती प्लस ही बियाणे वापरल्याने कपाशीचे पीक करपले, अशी तक्रार बिबी येथील शेतकºयाने पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली आहे.
कोरपना तालुक्यातील बिबी येथील शेतकरी सुरेंद्र बापुराव गिरडकर यांच्या सर्वे नं. मधील ३ एकर कपाशीची झाडे जागेवरच करपून वाळत आहे. यामुळे शेतकºयाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकºयाचे म्हणणे आहे. तक्रार सुरेंद्र गिरडकर म्हणाले, खरिपात हंगामातील नियोजनाप्रमाणे शेतात बियाणांची पेरणी करून काळजी घेण्यात आली. मशागतीसाठी बराच खर्च आला. मात्र, ऐन कापसाचे पीक हाती येण्याच्या कालखंडातच झाडे करपू लागली. याचा परिणाम फळधारणेवर होत असून पाने करपून वाळत आहेत. बियाण्यांमुळे हा प्रकार घडला. उत्पादन कमी होणार असून, याला कारण बियाणे आहे. नजीकच्याही शेतशिवारात काही शेतकºयांच्या कपाशीची झाडे अशीच करपत असल्याचा प्रकार दिसत आहे. त्यामुळे बियाणे कंपनीवर कारवाई करून गुन्हे दाखल करावी, अशी मागणी सुरेंद्र गिरडकर यांनी केली आहे.
कृषी विभागाकडून कानाडोळा
शेतकºयांनी यासंदर्भात पंचायत समिती कृषी विभागाकडे तक्रार केली. या घटनेला दोन आठवडे झाले. मात्र संबंधित अधिकाºयांनी शेतीची पाहणी केली नाही. वारंवार विचारणा करूनही जाणीवपूर्वक कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला. यासंदर्भात यवतमाळ येथील श्रीराम अ‍ॅग्रो कंपनीच्या व्यवस्थापंकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, हा परिणाम बियाण्यांमुळे नसून चुकीच्या व्यवस्थापनामुळे झाला आहे. याला कंपनी जबाबदार नाही.

Web Title: Bogass seeds cause cauliflower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.