जिल्ह्यात २०० वर बोगस डॉक्टर
By admin | Published: May 23, 2014 11:43 PM2014-05-23T23:43:43+5:302014-05-23T23:43:43+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावीत, या दृष्टिकोनातून शासनाने तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय तर, तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात आरोग्य उपकेंद्राची
चंद्रपूर: ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावीत, या दृष्टिकोनातून शासनाने तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय तर, तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात आरोग्य उपकेंद्राची स्थापना केली आहे. शासनाने ज्या उद्देशाने शासकीय रुग्णसेवा सुरू केली. त्याच उद्देशाला दुसरीकडे हरताळ फासत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ते रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत दोनशेच्या वर बोगस डॉक्टर असल्याची शासन दरबारी नोंद आहे. मात्र कारवाई करण्यास प्रशासन उदासिन असल्याचे दिसते. ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा ही नित्याचीच बाब झाली आहे. सोबतच अपुरा कर्मचारी अत्याधुनिक सोयीसुविधा नाही. हिच स्थिती प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे.बर्याच उपकेंद्रातील उपकेंद्रातील परिचारीकाही वेळेवर हजर राहत नाही. त्यामुळे त्या परिसरातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू होते. परिणामत: ग्रामीण भागातील रुग्णांना खिशाला आर्थिक कात्री लावत खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तर, अनेक गावात उपकेंद्र आहेत. मात्र ग्रामीण रूग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात अनियमित औषध पुरवठा, कर्मचारर्यांची कमतरता व अत्याधुनिक सुविधा आणि वैद्यकीय अधिकार्यांनी रिक्त पदे यामुळे शासकीय रुग्णसेवा पुर्णत: ढासळली आहे. याच संधीचा फायदा घेत जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र नसतानाही जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रासपणे बोगस डॉक्टरांनी रुग्णालय थाटले आहेत. बोगस डॉक्टरांकडे जाणार्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात लुट करण्यात येत आहे. मात्र नाईलाजाने रुग्णांना बोगस डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. काही बोगस डॉक्टर एजंटसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी दवाखाण्याच्या समोर बोर्ड लाऊन थेट दवाखान्याच व्यवसाय थाटला आहे. सध्या जिल्ह्यात २१५ च्यावर बोगस डॉक्टर असल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बोगस डॉक्टरांवर पायबंद घालण्याची मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना केवळ मोठ्या शहरामध्ये चार ते पाच वर्ष परिचर म्हणून काम केल्याच्या अनुभवाखाली बहुतांश नागरिकांनी स्वत:चे रुग्णालय थाटले आहे. सर्दी, खोकला, ताप या आजारांवर उपचार करून सर्रास नागरिकांची लूट केली जात आहे. गंभीर रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यास रुग्णांची थातुरमातुर तपासणी करून त्यांना दुसर्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. चंद्रपूर, कोरपना, चिमूर, पोंभूर्णा, जिवती, राजुरा अन्य तालुक्यातील गावांमध्ये बोगस डॉक्टरांची संख्या जास्त प्रमाणात आहे.(नगर प्रतिनिधी)