बोडी खोलीकरणाच्या कामात दाखविले बोगस मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:48 PM2018-03-13T23:48:13+5:302018-03-13T23:48:13+5:30

तालुक्यातील बोर्डा झुल्लूरवार येथे ग्राम रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने ४ लाख २० हजारांच्या निधीतून बोडी खोलीकरणाचे काम करण्यात आले.

Bogus laborers depicting Bodi's room | बोडी खोलीकरणाच्या कामात दाखविले बोगस मजूर

बोडी खोलीकरणाच्या कामात दाखविले बोगस मजूर

Next
ठळक मुद्देबोर्डा (झु.) येथील गैरव्यवहार : दोषींवर कारवाई करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमत
पोंभुर्णा : तालुक्यातील बोर्डा झुल्लूरवार येथे ग्राम रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने ४ लाख २० हजारांच्या निधीतून बोडी खोलीकरणाचे काम करण्यात आले. परंतु यामध्ये मजुरांची बोगस नावे दाखवून निधीचा गैरव्यवहार करण्यात आला. त्यामुळे ग्रामरोजगार सेवक, सरपंच व सचिवांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बोर्डा झुल्लूरवार येथे २०१६-१७ मध्ये बजरंग पत्रुजी कुळमेथे व ओंडू रामटेके या दोन शेतकºयांच्या शेतामध्ये बोडी खोलीकरणाचे काम करण्यात आले. परंतु हे काम नियमानुसार झाले नाही. सदर दोन्ही बोडीच्या कामासाठी ४ लाख २० हजारांचा निधी आला. हे काम चार हप्त्यांमध्ये आटोपून टाकण्यात आले. यामध्ये ३५ पेक्षा अधिक बोगस मजूर दाखविण्यात आले. हे मजूर कधीच कामावर आले नाहीत. अभियंता वाढई व गौरकार यांनी मोजमाप करण्यासाठी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी गेले असता जे मजूर दिसून आले. तेवढीच योग्य असून कागदोपत्री नोंदविलेले मजूर बोगस असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय, जे मजूर काम करीत आहेत त्यांच्या नावावरही जास्तीचे मोजमाप दाखविण्यात आले. कामावर उपस्थित नसतानाही बोगस मजुरांची नावे नोंदवून निधीचा गैरव्यवहार करण्यात आला, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
बोर्डा झुल्लूरवार येथील ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थकांचे वर्चस्व आहे. याचाच गैरफायदा उचलल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाºयांकडून चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांंनी केली आहे. बोडी खोलीकरणाबाबत ग्रामसेविका उराडे यांच्या भ्रमणध्वनीद्वारे विचारणा केली. मात्र, संपर्क होवू शकला नाही.

बोडी खोलीकरणाच्या कामात बोगस मजूरांची नावे नोंदविण्यात आली. शिवाय, त्यांच्या नावावर निधी उचलण्यात आल्याची तक्रार मिळाली आहे. त्यामुळे यासंदर्भातील पत्र अभियंत्यांना देण्यात आले. त्यांच्याकडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावरच पूढील कार्यवाही करू.
- शशिकांत शिंदे, बीडीओ, पोंभुर्णा

बोडी खोलीकरणाच्या कामाबाबत चौकशी पूर्ण झाली. अहवाल पूर्ण झाल्यावर संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
- सतीश वाढई, तंत्रज्ञ

बोर्डा झुल्लूरवार येथील बोडी खोलीकरणाबाबत पत्र देवून ग्रामरोजगार सेवकांकडून माहिती मागितली असून आर्थिक घोळ झाल्याचा अंदाज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करू.
- गौतम रामटेके सरपंच, बोर्डा झुल्लूरवार

Web Title: Bogus laborers depicting Bodi's room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.