बोंडअळी आता सरकीमध्येही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:55 PM2018-02-25T23:55:19+5:302018-02-25T23:55:19+5:30

मागील महिन्यात कपाशीच्या पिकात बोंडअळीने शिरकाव केल्याने कापसाच्या उत्पन्नात घट झाली. कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला.

Bondley is now also in Sarki | बोंडअळी आता सरकीमध्येही

बोंडअळी आता सरकीमध्येही

googlenewsNext
ठळक मुद्देजिनींग व्यावसायिकांना फटका : तेलाच्या उत्पन्नात घट

आॅनलाईन लोकमत
वरोरा : मागील महिन्यात कपाशीच्या पिकात बोंडअळीने शिरकाव केल्याने कापसाच्या उत्पन्नात घट झाली. कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. आता याच बोंडअळीने कापसाच्या सरकीमध्ये आक्रमण केल्याने सरकीपासून निघणाºया तेलाच्या उत्पन्नात कमालीची घट येत आहे. जिनींग व्यवसायी तुर्तास हादरले असल्याचे दिसून येत आहे.
जिनींग व्यवसायी कापूस शेतकºयाकडून घेतल्यानंतर कापसावर प्रक्रिया करून रूई व सरकी वेगळी केली जाते. या सरकीपासून तेल काढल्यानंतर उर्वरित जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग केला जातो. यावर्षी कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.
पाऊस कमी झाला व पावसाने उसंत दिल्यामुळे कापसाच्या उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेवून आपली रोखीचे कामे करण्याची योजना शेतकऱ्यांनी आखली.
त्यात कापूस पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादन थांबले व पुढील हंगामही व्यर्थ जाईल म्हणत अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकावर नांगर फिरविल्याच्या घटनाही घडल्या होत्या.
सध्या जिनिंगमध्ये बोंडअळी असलेला कापूस मोठ्या प्रमाणात येत आहे. कापसासारखी सरकीलाही बोंडअळी लागल्याने तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे. एक क्विंटल सरकीमध्ये १६ किलो तेल निघते.
सध्याच्या एका क्विंटल सरकीमधून ११ किलो तेल निघत असल्याने त्याचा फटका जिनिंग व्यवसायिकांना बसत आहे. तेल निघाल्यानंतर उर्वरित ढेप ही पाळीव जनावरांना सकस आहार म्हणून शेतकरी विकत घेऊन देत असतात. सरकीमध्ये बोंडअळी आल्याने काही शेतकरी पाळीव जनावरांना सकस आहार म्हणून ढेप खाऊ घालण्यास मागेपुढे बघत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याचाही फटका जिनिंग व्यवसायिकांना बसत असल्याचे काही व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Bondley is now also in Sarki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.