चंद्रपुरात होणार अस्थिमज्जा नोंदणी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:36 PM2019-06-14T23:36:42+5:302019-06-14T23:37:16+5:30

चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविलयाच्या माध्यमातून गरीब रूग्णांना उत्तम व अत्याधुनिक सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता अस्थिमज्जा नोंदणी केंद्र (बोन मॅरो रजीस्ट्रेशन सेंटर) तसेच नॅट आधुनिक रक्त तपासणी केंद्र स्थापन करण्यासाठी........

Bone marrow registration center will be located at Chandrapur | चंद्रपुरात होणार अस्थिमज्जा नोंदणी केंद्र

चंद्रपुरात होणार अस्थिमज्जा नोंदणी केंद्र

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविलयाच्या माध्यमातून गरीब रूग्णांना उत्तम व अत्याधुनिक सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता अस्थिमज्जा नोंदणी केंद्र (बोन मॅरो रजीस्ट्रेशन सेंटर) तसेच नॅट आधुनिक रक्त तपासणी केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हार्षवर्धन यांची नवी दिल्ली येथे भेट घेत सकारात्मक चर्चा केली. न्युक्लीक अ‍ॅसिड टेस्टींग (नॅट) च्या माध्यमातून एच.आय.व्ही., एच.बी.व्ही., एच.सी.व्ही. यासारख्या अनेक गंभीर आजारांची रक्त तपासणी व दर्जेदार रोगनिदानाचे काम होणार आहे. दैनंदिन रक्त तपासणीसाठी सर्वसाधारण पॅथालॉजीमध्ये महिनाभराचा कालावधी लागत असेल तर नॅटमधून हीच तपासणी ३ ते ५ दिवसात शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील रूग्णांचे तत्काळ रोगनिदान होण्यास मदत होईल. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिमज्जा नोंदणी केंद्रामुळे (बोन मॅरो रजीस्ट्रेशन सेंटर) कॅन्सरग्रस्तांसह थॅलेसेमिया, सिकलसेल अनेमिया, लिम्फोमा यासारख्या रक्तदोष असलेल्या रूग्णांना चंद्रपूर येथेच नोंदणी सुविधा उपलब्ध होणार आहे.

Web Title: Bone marrow registration center will be located at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.