भद्रावतीत प्लॉस्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:09 PM2018-04-16T23:09:04+5:302018-04-16T23:09:04+5:30

नगरपालिकातर्फे प्लास्टिक व थर्माकोल बंदीला सोमवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. यावेळी पानठेला, किराणा दुकान तथा बेकरी येथून जवळपास १५ किलो प्लॉस्टिक पिशव्या व खर्रा पन्नी जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे मिरवणुकीदरम्यान लावण्यात आलेल्या प्लॉस्टिक पताकाही जप्त करण्यात आल्या.

Boundary plastic bags seized | भद्रावतीत प्लॉस्टिक पिशव्या जप्त

भद्रावतीत प्लॉस्टिक पिशव्या जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देनगर पालिकेची कारवाई : व्यावसायिकांना तंबी

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : नगरपालिकातर्फे प्लास्टिक व थर्माकोल बंदीला सोमवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. यावेळी पानठेला, किराणा दुकान तथा बेकरी येथून जवळपास १५ किलो प्लॉस्टिक पिशव्या व खर्रा पन्नी जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे मिरवणुकीदरम्यान लावण्यात आलेल्या प्लॉस्टिक पताकाही जप्त करण्यात आल्या.
या मोहिमेमध्ये नगरपालिकेला व्यवसायिकांनी सहकार्य केले असून पानठेल्यावर प्लॉस्टिक पन्नी कागदाचा वापर करणे सुरु केले आहे. महाराष्टÑ प्लॉस्टिक व थर्माकोल अविघटनशिल वस्तूंचे उत्पादन वापर, विक्री वाहतूक, हाताळणी, साठवणूक अधिसूचना २०१८ कलम ४ (१) मधील तरतुदीनुसार नगरपालिकेने विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकाने सोमवारी सकाळी १० वाजता नगरपालिका ते बसस्थानकांपर्यंत असलेले पानठेले तथा विविध दुकानांची झडती घेतली. यावेळी व्यावसायिकांकडून प्लॉस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. दरम्यान व्यावसायिकांकडून हमीपत्र भरुन घेण्यात आले आहे. तर बहुतेक व्यापाऱ्यांनी प्लॉस्टिक पिशवीचा बंद केल्याचे निर्देशनास आल्याची माहिती न.प.अधिकाºयांनी दिली. पथकामध्ये इर्शाद अहमद बेग, एन. नरचापे, अभियंता एस. चोचमकर, अभियंता आर. गड्डमवार, रफीक शेख, ज्योती लालसरे यांचा समावेश असल्याची माहिती सीओ जाधव यांनी दिली.

Web Title: Boundary plastic bags seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.