विविध वैशिष्ट्यांनी नटलेला ब्रह्मपुरी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:54 PM2019-01-20T22:54:48+5:302019-01-20T22:55:28+5:30

कला, संस्कृती, क्रीडा, शेतीविषयक, आरोग्य, स्वच्छता आदी विविध बाबींनी नटलेल्या ब्रह्मपुरी महोत्सवाला गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी केली. ब्रह्मपुरी महोत्सव अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला असल्याच्या प्रतिक्रिया महोत्सवाला आलेल्या नागरिकांनी दिली.

The Brahmapuri Festival, which has been distinguished by various features | विविध वैशिष्ट्यांनी नटलेला ब्रह्मपुरी महोत्सव

विविध वैशिष्ट्यांनी नटलेला ब्रह्मपुरी महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देमहोत्सवाला अनेकांची भेट : ब्रह्मपुरीकरांना मनोरंजनाची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : कला, संस्कृती, क्रीडा, शेतीविषयक, आरोग्य, स्वच्छता आदी विविध बाबींनी नटलेल्या ब्रह्मपुरी महोत्सवाला गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी केली. ब्रह्मपुरी महोत्सव अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला असल्याच्या प्रतिक्रिया महोत्सवाला आलेल्या नागरिकांनी दिली.
ब्रह्मपुरी महोत्सवातील प्रदर्शनीतील विविध स्टॉलमध्ये अकोला येथील गांधी ग्रामची गुळपट्टी लोकांसाठी विशेष आकर्षण ठरली. नामवंत शेती बियानांमध्ये अंकूर महाबीज, यशोदा, मिसार, अ‍ॅग्रो, न्यूजीवेडू, जीएसपी, महेंद्र गृप आदीनी पिकांच्या संदर्भात निशुल्क माहितीचे स्टॉल लावले आहेत. शेतीसाठी लागणारे विविध अवजारे त्यात आयसर, महिंद्रा व स्वराज यांची शेतीव्यवसायाला होणारी मदत हे महोत्सवातील वैशिष्टे आहेत. ई-बाईक आकर्षित करीत असून पेट्रोल मुक्तीची संदेश देत आहे. तालुका कृषी अधिकारी ब्रह्मपुरी, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही जनजागृती करीत आहे.
बांबूवर आधारित स्वयंरोजगार प्रदर्शन
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिचपल्ली येथे बांबूवर आधारित बांबू प्रकल्प तयार करून अनेकांना रोजगार प्राप्त करून दिला. ही बाब हेरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रकल्पाला हेरून हे प्रदर्शन महोत्सवात सुरू केल्याने हे प्रदर्शन सर्वांना आकर्षनाचे केंद्र ठरले असून अनेकजण भेट देत आहेत.

Web Title: The Brahmapuri Festival, which has been distinguished by various features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.