विदर्भात ब्रह्मपुरीचे तापमान सर्वाधिक; चंद्रपूर ४२.८ अंश सेल्सिअस

By साईनाथ कुचनकार | Published: April 19, 2023 07:16 PM2023-04-19T19:16:00+5:302023-04-19T19:16:25+5:30

Nagpur News बुधवारी ब्रह्मपुरीचे तापमान ४३.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून चंद्रपूरचे ४२.८ अंश सेल्सिअस तापमान होते.

Brahmapuri has the highest temperature in Vidarbha; Chandrapur 42.8 degrees Celsius | विदर्भात ब्रह्मपुरीचे तापमान सर्वाधिक; चंद्रपूर ४२.८ अंश सेल्सिअस

विदर्भात ब्रह्मपुरीचे तापमान सर्वाधिक; चंद्रपूर ४२.८ अंश सेल्सिअस

googlenewsNext

चंद्रपूर : तापमानाने सलग सातव्या दिवशीसुद्धा चंद्रपुरात उच्चांक गाठला आहे. बुधवारी ब्रह्मपुरीचे तापमान ४३.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून चंद्रपूरचे ४२.८ अंश सेल्सिअस तापमान होते.

या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा सोसवेनाशा झाल्या आहेत.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून चंद्रपुरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ११ एप्रिलपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. सतत तापमान उच्चांक गाठत आहे. १२ एप्रिल ४२.२, १३ एप्रिल ४३.२, १४ एप्रिलला ४२.८ अंशावर पारा होता. १५ एप्रिलला ३९.४ वर आला. तर, १७ एप्रिलला तापमानाने उच्चांक गाठत ४३.२ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली. तर बुधवारी ब्रह्मपुरीचे तापमान विदर्भात सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिएस नोंदविले गेले.
चंद्रपूरचे सोमवारचे तापमान राज्यात सर्वाधिक ठरले होते.

Web Title: Brahmapuri has the highest temperature in Vidarbha; Chandrapur 42.8 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान