ब्रह्मपुरी नगर परिषदेचा भोंगळ कारभार
By Admin | Published: April 11, 2017 12:49 AM2017-04-11T00:49:45+5:302017-04-11T00:49:45+5:30
देलनवाडी प्रभाग क्र ४ मधील नाल्यावर अतिक्रमण झाला असून थातूरमातूर त्यांच्या बांधकामाची निविदा काढली आहे.
वाही नाला अतिक्रमण प्रकरण : जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
ब्रह्मपुरी : देलनवाडी प्रभाग क्र ४ मधील नाल्यावर अतिक्रमण झाला असून थातूरमातूर त्यांच्या बांधकामाची निविदा काढली आहे. त्या निविदामध्ये कुठेही एकसूत्रीपणा नसल्याने पुन्हा एकदा नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
ब्रह्मपुरी शहरांतर्गत वाही नाला इतिहासकालीन आहे. कधी काळी हा नाला ब्रह्मपुरीचा वैभव होता. बारई समाजाच्या वतीने पानाची मळे फुलविली जात होती. कालांतराने वस्त्या वाढत गेल्या व शेतजमिनीची विल्हेवाट वास्तव्यास येऊ लागली. परंतू सिटी सर्वेक्षणा नुसार हा नाला कायम राहणे अपेक्षित होते. सिटी सर्व्हे नुसार हा नाला कुठे सहा मीटर, तर कुठे १३ मीटरपर्यंत रुद आहे. तर खेडवरुन हा नाला गराडी नाल्यात विलिन होत असल्याचे दाखविले जात आहे. परंतु सद्या या नाल्याची लांबी व रुंदी हे दोन्ही धोक्यात आले आहे. जेव्हा या नाल्याच्या अतिक्रमणाबाबत नगर परिषदेच्या सभागृहात प्रश्न चर्चेला आला. तेव्हा नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निश्चित करण्यात आले. निविदा मंजूर करण्यात आली परंत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांना विश्वासात घेऊन काढण्यात आली नसल्याचे उपाध्यक्षा रश्मी पेशने यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता. नाल्याचे बांधकाम करून अतिक्रमणधारकांना दिलासा देणार की नक्कीच अतिक्रमण काढले जाणार याबाबत अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहे. कारण नाल्याचे बांधकाम करण्यापूर्वी भूमापन विभागाकडून सदर नाल्याचे सर्वेक्षण करण्यात आले नाही ही वस्तूस्थिती आहे. सर्वेक्षणांतर्गत नाल्याची रेकार्डप्रमाणे रुंदी व आज अस्तीत्वात असलेली रुंदी विचारात न घेऊन कामाची निविदा काढणे म्हणजे कुणाला आश्रय देण्यात येणार आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी या भोंगळ ाकरभारावर लक्ष देण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)