ब्रह्मपुरी पंचायत समितीला मिळाले हातपंप दुरुस्ती वाहन

By admin | Published: June 6, 2017 12:37 AM2017-06-06T00:37:18+5:302017-06-06T00:37:18+5:30

गेल्या कित्येक महिन्यांपासून नादूरुस्त असलेले हातपंप दुरुस्त करण्याासाठी ब्रह्मपुरी पंचायत समितीला स्वत:चे स्वतंत्र वाहन नव्हते.

Brahmapuri Panchayat Samiti got hand pump repair vehicle | ब्रह्मपुरी पंचायत समितीला मिळाले हातपंप दुरुस्ती वाहन

ब्रह्मपुरी पंचायत समितीला मिळाले हातपंप दुरुस्ती वाहन

Next

समस्या सुटणार : सभापतींच्या प्रयत्नांना यश
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : गेल्या कित्येक महिन्यांपासून नादूरुस्त असलेले हातपंप दुरुस्त करण्याासाठी ब्रह्मपुरी पंचायत समितीला स्वत:चे स्वतंत्र वाहन नव्हते. त्यामुळे पाणी समस्या सोडविण्यासाठी अडचणी यायच्या. मात्र आता पंचायत समितीला नवे वाहन मिळाले आहे.
ब्रह्मपुरी पंचायत समितीला वाहन हातपंप दुरूस्ती वाहन नसल्यामुळे नागभीड पंचायत समितीचे वाहन १५ दिवसांसाठी फक्त मिळायचे. उन्हाळ्यातील पाण्याची समस्या बघता ब्रह्मपुरी पंचायत समितीचे वाहन किरायाने घेतले. जवळपास ५० गावातील नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यात आले.
ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या सभापती प्रणाली प्रमोद मैंद व उपसभापती विलास उरकुडे यांनी पाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांच्याकडे सभापती प्रणाली मैंद यांनी सतत मागणी व पाठपुरावा केला व शेवटी प्रयत्नाला यश आले. एका छोटेखाणी समारंभात जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, सभापती प्रणाली मैंद व संवर्ग विकास अधिकारी प्रदीप विरमवार, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र पापडकर यांच्याकडे हातपंप दुरुस्ती वाहन सुपूर्द केले.
याप्रसंगी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्थ व नियोजन सभापती जिवतोडे, बालकल्याण सभापती केंद्रे, जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर उपस्थित होते.

Web Title: Brahmapuri Panchayat Samiti got hand pump repair vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.