चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून ब्रह्मपुरी तालुका वगळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:14+5:302021-02-07T04:26:14+5:30

ब्रम्हपुरी : महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयाने अपर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करण्यात आला आहे. ...

Brahmapuri taluka should be excluded from Chimur Upper Collectorate | चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून ब्रह्मपुरी तालुका वगळावा

चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून ब्रह्मपुरी तालुका वगळावा

Next

ब्रम्हपुरी : महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयाने अपर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करण्यात आला आहे. ब्रम्हपुरी-चंद्रपूर रेल्वे सेवा, बस सेवा, राज्य मार्ग, अनेकविध कार्यालये असल्याने ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी चंद्रपूर हेच ठिकाण याेग्य आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून ब्रह्मपुरी तालुका वगळावा, अशी मागणी आहे.

गेल्या ४० वर्षांपासून ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण करावा, यासाठी नागरिकांनी अनेकदा संघर्ष केला आहे. म्हणून कृती संसाधन समिती ब्रम्हपुरीद्वारा यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच उपविभागीय अधिकारी क्रांती डाेंबे यांच्याकडे आक्षेप पत्र दिले. यावेळी ॲड. नंदा फुले, प्रा. गिरीधर बारसागडे, ईश्वर जनबंधू, राजेंद्र माेटघरे, दामाेधर भागडकर, पाेपेश्वर आळे, भिवा राऊत, अनिल जाधव, पटवारी राजेश्वर, विनायक साेंदरकर, मनोहर कलंत्री, माराेती प्रधान, अनिल उंदिरवाडे, नंदकिशोर धकाते, उमेश बागडे, विजय चव्हाण, प्रभू लोखंडे, नरेशचंद्र सहारे, राहुल बाेदेले, माेतीलाल देशमुख, दिनेश मेश्राम, वाघ उपस्थित हाेते.

Web Title: Brahmapuri taluka should be excluded from Chimur Upper Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.