ब्रह्मपुरीचे सर्वाधिक तापमान @ ४५.९
By admin | Published: April 17, 2017 12:37 AM2017-04-17T00:37:47+5:302017-04-17T00:37:47+5:30
सध्या सूर्य आग ओकू लागला असून तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
चंद्रपूर : सध्या सूर्य आग ओकू लागला असून तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रविवारी ब्रह्मपुरीचे सर्वाधिक तापमान ४५.९ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूरचे तापमान ४५.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
गेल्या चार दिवसांपासून तापमानात उत्तरोत्तर वाढ होत आहे. १५ एप्रिल रोजी चंद्रपूरचे कमाल तापमान ४५.२ अंश सेल्सिअस आणि ब्रह्मपुरीचे तापमान ४४.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी ब्रह्मपुरीने चंद्रपूरपेक्षा झेप घेतली आहे. ब्रह्मपुरीचे कमाल तापमान ४५.९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.८ अंश सेल्सिअस तर चंद्रपूरचे किमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. अचानक तापमान वाढल्यामुळे गेल्या काही दिवसात चंद्रपूर शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. प्रशासनाने देखील वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. (प्रतिनिधी)