वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता ब्रह्मपुरीत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:06 PM2018-02-03T23:06:11+5:302018-02-03T23:06:48+5:30
विदर्भ राज्य देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ब्रह्मपुरीतील शिवाजी चौकात विदर्भ राज्य समन्वय समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : विदर्भ राज्य देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ब्रह्मपुरीतील शिवाजी चौकात विदर्भ राज्य समन्वय समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
विदर्भ राज्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी विदर्भवाद्यांनी अनेकदा आंदोलन केले. दरम्यान भाजपाने सत्तेमध्ये आल्यानंतर विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन केले होते. मात्र अजूनही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे विदर्भ राज्य समन्वय समितीच्या वतीने जोपर्यंत विदर्भ स्वतंत्र्य राज्य देण्यात येत नाही. तोपर्यंत प्रत्येक महिन्यांच्या एक तारखेला धरणे आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याअनुषंगाने गुरुवारी ब्रह्मपुरीत धरणे आंदोलन केले. सदर आंदोलन डॉ. डी. एन. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी डॉ. प्रेमलाल मेश्राम, अॅड. गोविंद भेंडारकर, डॉ. प्रेमलाल मेश्राम, माणिकलाल बारसागडे, सुधीर सेलोकर, ज्ञानेश्वर जोगे यांनी मार्गदर्शनातून आपल्या भूमिका मांडल्या. तसेच जोपर्यंत विदर्भ राज्य देण्यात येत नाही. तोपर्यंत लढा सुरु ठेवण्याचे आवाहन उपस्थित सर्व कार्यकत्यांना केले.
यावेळी हरिश्चंद्र चोले, गायकवाड, विनोद झोडगे, हनुमंतराव राऊत, अरविंद नागोसे, निकेश तोंडरे, सुखदेव प्रधान, विनायक रामटेके, नामदेवराव गेडाम, फाल्गून राऊत, विनायक रामटेके, सुधा राऊत, तुकाराम चोले, प्रतिभा डांगे, लिना जोगे, प्रतिभा लाडे, गीता मेश्राम आदी तसेच विदर्भवादी कार्यकर्तेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार वासुदेव कढिखाये यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
अशा आहेत मागण्या
स्वतंत्र्य विदर्भ राज्य द्यावे, रोजगार भरती करावी, भारनियमन बंद करावे, वीज दर कमी करावे, विदर्भातील कोळश्यावर आधारित १३२ वीज प्रकल्पांची मान्यता रद्द करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.