औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:46 PM2018-12-02T22:46:10+5:302018-12-02T22:46:42+5:30
जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विविध उद्योग कार्यरत आहेत. तसेच कोळशाच्या खाणीसुद्धा आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या अनेक वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. या समस्या उद्भवू नये म्हणून पोलीस व औद्योगिक क्षेत्र यांच्यामध्ये योग्य समन्वय आवश्यक असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विविध उद्योग कार्यरत आहेत. तसेच कोळशाच्या खाणीसुद्धा आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या अनेक वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. या समस्या उद्भवू नये म्हणून पोलीस व औद्योगिक क्षेत्र यांच्यामध्ये योग्य समन्वय आवश्यक असते. या दृष्टीने शनिवार दि. १ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक कार्यालय मंथन हॉल येथे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक पार पडली.
सदर बैठकीला सीटीपीएस सीआयएसएफ कंमाडंट विवेक सिंग, एसडीएम गव्हाड, उपविभागीय अधिकारी सुशिलकुमार नायक, उपविभागीय अधिकारी विलास यामावार आणि जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर बैठकीदरम्यान या वर्षात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्राच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. व त्यातून निर्माण होणाºया कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर प्रतिबंध घालण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेकवेळा कामगाराचे बंद पुकारणे, मोर्चे तसेच शेती अधिग्रहणाविरुद्ध शेतकºयांचे मोर्चे इत्यादी समस्या वारंवार उद्भवत असतात. त्यावर सुद्धा बैठकीदरम्यान उपाय योजनात्मक मार्गदर्शन करण्यात आले.
सदरबैठकीला औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १०० प्रतिनिधींची उपस्थिती होते. उपस्थितांपैकी प्रत्येकांनी आपल्या समस्या मांडल्या. पोलीस विभागाशी निगडीत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक तथा संचलन प्रभारी अधिकारी पोनि जयंत चव्हाण यांनी केले. यावेळी पोलीस निरिक्षक कोकाटे, पोलीस निरिक्षक गडचांदूरचे पवार, भद्रावतीचे पोलीस निरिक्षक मडावी, पडोलीच्या पोलीस निरिक्षक ढाले, स्थागुशाचे निरिक्षक अंभोरे, सुरक्षा शाखा तिवारी, घुग्घुस चहांदे, पाटील, चव्हाण आदी उपस्थित होते.