ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:31 AM2021-09-06T04:31:51+5:302021-09-06T04:31:51+5:30

चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विकास कामांना खीळ बसली होती. आता मात्र ‘पुनश्च हरीओम’ ...

Bramhapuri area will be transformed | ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार

ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार

Next

चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विकास कामांना खीळ बसली होती. आता मात्र ‘पुनश्च हरीओम’ म्हणत राज्य सरकारने विकासाला गती दिली आहे. ब्रम्हपुरी क्षेत्रातसुध्दा विकासाचे स्वप्न साकार होत आहे. सिंचनाच्या सुविधेबरोबरच अंतर्गत रस्ते, पूल व इतर विकास कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असून ती पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ब्रम्हपुरी शहरात सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नवीन इमारतीचे व शासकीय विश्रामगृहाच्या कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, नागभीड पंचायत समिती सभापती प्रफुल खापर्डे स्मिता पारधी, खेमराज तिडके, प्रा. राजेश कांबळे, प्रभाकर सेलोकर, न.प.उपाध्यक्ष अशोक रामटेके, प्रकाश देवतळे, ज्ञानेश्वर कायरकर, मंगला लोणपल्ले, उपअभियंता अरुण कुचनवार आदी उपस्थित होते.

ब्रम्हपुरी क्षेत्रात ७५ हजार हेक्टरवर सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यामुळे शेतजमीन सुपीक होत आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागाचा विकास करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रामीण भागाचे रस्ते शहरासोबत जोडून दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या भागाच्या विविध विकासकामांच्या १०० कोटींच्या निविदा येत्या आठवड्याभरात निघणार आहे. भविष्याचा विचार करता ब्रम्हपुरी एक नामांकित शहर म्हणून उदयास येईल, असेही ते म्हणाले.

येथील पंचायत समिती इमारतीच्या बांधकामाकरिता १६ कोटी मंजूर झाले आहेत. नगर परिषदेची इमारत पूर्णत्वास आली आहे. १०० खाटांचे रुग्णालय, ई-लायब्ररी, सात कोटी रुपये खर्च करून क्रीडा संकुल, उड्डाण पुलासाठी ७५ कोटी, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी २० कोटी मंजूर झाले आहे. तसेच वडसाकडे जाणारा अंतर्गत रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून त्यासाठी ९० कोटींचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाॅक्स

रुग्णवाहिका व स्वर्गरथाचे लोकार्पण :

स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत ब्रम्हपुरी नगर परिषदेला देण्यात आलेल्या रुग्णवाहिका व स्वर्गरथाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वासेकर, हितेंद्र राऊत, नितीन वऱ्हाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Bramhapuri area will be transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.