बैठे पथकाच्या धास्तीने रेती तस्करीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:23+5:302021-05-31T04:21:23+5:30

गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले दररोज रात्री पथक असते तैनात : तत्काळ होते कारवाई गोंडपिपरी : तालुक्यातील विविध ...

Break the sand smuggling with the fear of the sitting squad | बैठे पथकाच्या धास्तीने रेती तस्करीला ब्रेक

बैठे पथकाच्या धास्तीने रेती तस्करीला ब्रेक

Next

गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

दररोज रात्री पथक असते तैनात : तत्काळ होते कारवाई

गोंडपिपरी : तालुक्यातील विविध रेती घाटांवरून गेल्या अनेक दिवसांपासून रात्रपाळी रेतीचे अवैध उत्खनन करीत वाहतूक सुरू होती. याला लगाम लावण्याकरिता महसूल विभागाने कंबर कसत स्थानिक मुख्य चौकात रात्रपाळी गस्त पथकाची नियुक्ती केल्यानंतर अवैध रेती उत्खननाला ब्रेक लागला असून तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या व त्यांना असलेले जोड नाले यात उत्तम दर्जाची व मुबलक प्रमाणात रेती दरवर्षी साठून राहते. अशातच परिसर व लगतच्या शहरांमध्ये वाळूची वाढती मागणी पाहता तालुक्यातील ट्रॅक्टर व्यवसायिकांसह मोठ्या वाळूमाफियांनी रात्रपाळी अवैध करण्याचा सपाटा सुरू केला होता. याला लगाम लावण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी तहसीलदारांमार्फत एका विशेष बैठे पथकाची नेमणूक केली. या पथकात मंडळ अधिकारी पी.बी.सुर्वे यांच्यासह बदलत्या क्रमवारीनुसार पोलीस पाटील, तलाठी व पोलीस कर्मचारी असा गट तयार करून यांची सायंकाळी ७ ते सकाळी ७ असे बैठे पथक स्थानिक शिवाजी चौकात गस्तीसाठी स्थापन करण्यात आले. तर तालुक्यात कुठेही उत्खनन होत असल्यास याची गोपनीय माहिती देण्यासाठी एक भ्रमणध्वनी क्रमांक कार्यान्वित केला. माहिती मिळताच लगेच मंडळ अधिकारी व सोबतीला पोलीस कर्मचारी हे तत्काळ घटनास्थळावर जाऊन चौकशीअंती कारवाई करतात. तसेच ज्या तलाठी सजामध्ये अवैध उत्खनन होत असून त्याची माहिती न दिल्यास किंवा अवैध उत्खननाला सहकार्य केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करणार, अशी माहिती गोंडपिंपरी तहसीलदार के.डी. मेश्राम यांनी दिली आहे.

बॉक्स

२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

रात्रपाळी चालणाऱ्या या घटकामुळे अवैद्य उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून मागील आठवड्यात तहसीलदार के.डी. मेश्राम यांनी केलेल्या कारवाईत २५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करून दंडात्मक तथा फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला होता.

===Photopath===

300521\fb_img_1622109333810.jpg

===Caption===

गोंडपिपरी तहसीलदार के.डी. मेश्राम यांचा फोटो

Web Title: Break the sand smuggling with the fear of the sitting squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.