कोरोना नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:29 AM2021-05-19T04:29:23+5:302021-05-19T04:29:23+5:30
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे राज्य सरकारने लाॅकडाऊन केले. यामुळे नागरिकांवर विविध निर्बंध आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवांचे दुकाने सकाळी ...
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे राज्य सरकारने लाॅकडाऊन केले. यामुळे नागरिकांवर विविध निर्बंध आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवांचे दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरु ठेवता येते. असे असतानाही काही व्यावसायिक लपून-छपून नियमांना पायदळी तुडवत आपले दुकाने सुरु ठेवून कोरोनाचे नियम तोडले. यासंदर्भात महसूल विभागाला माहिती मिळताच चार दुकानांवर धाड टाकून दुकान मालकांकडून ७४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
यामध्ये दोन कापड दुकाने, एक मोबाईल दुकान तसेच हार्डवेअर तसेच प्लंबिंग साहित्याच्या दुकानाचा समावेश असून ही दुकाने सरदार पटेल काॅलेज परिसरातील एक, छोटा बाजार परिसरातील पाताळेश्वर मंदिर परिसरातील तसेच जनता काॅलेज चौकातील एका दुकानाचा समावेश आहे. ही कारवाई नायब तहसीलदार राजू धांडे यांच्या नेतृत्वामध्ये मंडळ अधिकारी नवले, मुसळे, अनवर शेख, प्रवीण वरभे, तलाठी विशाल कुहेकर यांनी केली.