श्वास हा जीवनाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:23 AM2020-12-25T04:23:50+5:302020-12-25T04:23:50+5:30
शिल्पा चन्ने : योगा फाँर रेस्पिरेटरी सिस्टिमद्वारे शिबिर चंद्रपूर : श्वास हा जीवनाचा आधार आहे. त्यामुळे शरीर तंदुरुस्तीसाठी व्यायाम ...
शिल्पा चन्ने : योगा फाँर रेस्पिरेटरी सिस्टिमद्वारे शिबिर
चंद्रपूर : श्वास हा जीवनाचा आधार आहे. त्यामुळे शरीर तंदुरुस्तीसाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. दररोज नियमितपणे योग प्राणायाम केला तर शरीरात पांढर्या रक्त पेशी वाढून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे प्रत्येकांनी व्यायाम करून आपले आरोग्य जपावे, असे आवाहन डाॅ. शिल्पा चन्ने यांनी केले.
योगा फाॅपर रेस्पिपेटरी सिस्टमद्वारे आमरोली योगपीठात
आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ राजूरकर उपस्थित होते.
डाॅ. चन्ने म्हणाल्या, नोकरी कामानिमित्त अनेकांना प्रदूषित वातावरणात काम करावे लागते. त्यामुळे श्वास संबंधित अनेक रोगांना आपण आमंत्रण देतो. त्यामुळे नियमितपणे योग प्राणायाम केला तर रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपल्याला आरोग्य जपता येते असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, योगाचे प्रात्याक्षिकही करून दाखविण्यात आले.
यावेळी छाती रोगतज्ज्ञ डॉ. सौरभ राजूरकर म्हणाले, प्रदूषित वातावरणामुळे दमा, न्यूमोनिया, एलर्जी, आदी रोगाला आमंत्रण दिल्या जात आहे. त्यामुळे प्रत्येकांनी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. प्राणायामातून रोगप्रतिकार शक्ती वाढविणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला.