मानवनिर्मित धुरामुळे गुदमरतोयं श्वास

By admin | Published: January 29, 2016 04:17 AM2016-01-29T04:17:52+5:302016-01-29T04:17:52+5:30

प्रदूषणात राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या चंद्रपूर शहरात केवळ उद्योगांमुळेच प्रदूषण होते असे नाही. आरोग्याला

Breathlessness due to man-made smoke | मानवनिर्मित धुरामुळे गुदमरतोयं श्वास

मानवनिर्मित धुरामुळे गुदमरतोयं श्वास

Next

चंद्रपूर : प्रदूषणात राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या चंद्रपूर शहरात केवळ उद्योगांमुळेच प्रदूषण होते असे नाही. आरोग्याला हाणीकारक असे धूर ओकणारे शेकडो वाहने रस्त्यावर धावतात, यामुळेही प्रदूषण वाढत आहे. मात्र अनेक वॉर्डात दिवसभर कचरा जळताना दिसून येत असून हा मानवनिर्मीत धूरही चंद्रपूरकरांचा श्वास कोंढत आहे.
चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाने काही दिवसांपुर्वीच ‘स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूर’ ही मोहीम हाती घेऊन वॉर्डावॉर्डात घंटागाड्या सुरू केल्या आहेत. या घंटागाड्या दररोज नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन कचरा गोळा करतात. मात्र या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने अनेक वॉर्डात मोकळ्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येतात. या कचऱ्याला आग लावली जात असल्याने हा कचरा दिवसभर जळत राहते. परिणामी वॉर्डात पूर्णत: धूर पसरत आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधील जटपूर वॉर्ड क्रमांक १ मध्ये नगीना मज्जीदला लागून असलेल्या महानगर पालिकेच्या खुल्या जागेत कचरा गोळा केला जात आहे. त्यामुळे येथे मोठे कचऱ्याचे ढीग जमा झाले असून येथील कचरा नियमीत उचलला जात नाही व कचऱ्याला आग लावली जाते. त्यामुळे वॉर्डात मोठ्या प्रमाणात धूर पसरत आहे. या कचऱ्याच्या ढिगारामुळे नागरिकही येथेच कचरा टाकतात. तर जवळच असलेले व्यवसायिक नॉयलन टॉयर, भंगार वस्तू येथे टाकत असतात. त्यामुळे हा कचरा बराच वेळ जळत राहते. याबाबत नागरिकांनी महानगर पालिकेला निवेदन दिले, आयुक्तांशी चर्चा केली. मात्र येथील कचरा साफ झाला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड प्रमाणात धूराचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

ंंंं कारवाई करावी
४स्वच्छ व सुंदर चंद्रपूरसाठी मनपाकडून कार्यवाही सुरू आहे. मात्र व्यवसायिक मोकळ्या जागेवर कचरा गोळा करून अनेकदा आग लावतात. त्यामुळे अशा व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. मनपाने याची दखल घ्यावी.

व्यवसायिक लावतात कचऱ्याला आग
४कचरा गोळा करण्यासाठी महानगर पालिकेच्या घंटा गाड्या घरोघरी जात आहेत. मात्र व्यवसायिकांच्या दुकानांमधून निघणारा कचरा हा अनेक जण मोकळ्या जागेत टाकत असतात. यात खर्डे, प्लॉस्टीक, नॉयलन दोरी असे अधिक पेट घेणारा कचरा असते. या कचऱ्याचा मोठा ढीग जमा झाल्यानंतर व्यवसायिकच या कचऱ्याला आग लावून देतात. त्यामुळे हा कचरा दिवसभर जळताना दिसून येते.

आझाद बगीच्या जवळील राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागे महानगर पालिकेने कचऱ्याचा कंटेनर ठेवला आहे. या कंटेनरमध्ये घंटागाड्यांद्वारे कचरा गोळा करणारे कर्मचारी कचरा आणून टाकत असतात. तर या परिसरातील व्यावसायिकही येथेच कचरा टाकत असतात. मात्र या कंटेनरमधील कचरा नियमीत साफ केला जात नाही. या कचऱ्याला आग लावली जात असल्याने दिवसभर कचरा जळत असते. हा प्रकार दोन ते तीन दिवसाला नेहमीच घडत असून कचरा जळण्याच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात धुराचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Breathlessness due to man-made smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.