वर-वधूंनी दिला प्लॉस्टिक बंदीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:04 AM2018-05-06T00:04:36+5:302018-05-06T00:04:36+5:30
ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाला आपलेही काही देणे लागते. याच भावनेतून येथील राजू गुंडावार परिवाराने लग्न सोहळ्याच्या माध्यमातून केला. गुंडावार व भास्करवार परिवाराने प्लॉस्टिक बंदीचा संदेश देऊन नवा सामाजिक बांधिलकी जपली.
सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाला आपलेही काही देणे लागते. याच भावनेतून येथील राजू गुंडावार परिवाराने लग्न सोहळ्याच्या माध्यमातून केला. गुंडावार व भास्करवार परिवाराने प्लॉस्टिक बंदीचा संदेश देऊन नवा सामाजिक बांधिलकी जपली. हा विवाह सोहळा चंद्रपुरात नुकताच पार पडला.
लग्न सोहळा म्हटले की, सजावट, रुखवंत, साजश्रुंगार या गोष्टी आकर्षित करीत असतात. परंतु या विवाहात स्वच्छ महाराष्ट्र अभियान ‘प्लास्टिक कॅरीबॅग हद्दपार करा, कापडी बॅगचा वापर करा’ असा संदेश देणारे बॅनर्स पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करण्यात आली होती. प्लॉस्टिक मुक्तीसाठी भद्रावती नगर परिषदेला सहकार्य करा, असा संदेश राजू गुंडावार यांनी तर चंद्रपूर महानगर पालिकेला सहकार्य करा, हा संदेश संजय भास्करवार यांच्या माध्यमातून देण्यात आला होता.
प्लॉस्टिकच्या पिशव्यांपासून मुक्त होण्याच्या दृष्टीने वर-वधू परिवाराकडून सुमारे २००० कापडी पिशव्या वºहाड्यांना देण्यात आल्या. लग्नातील पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तु देण्याची प्रथा आहे. या भेटवस्तू साधारणत: प्लॉस्टिक बॅगमध्ये दिल्या जातात. परंतु याला तिलांजली देत प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यामधून भेटवस्तु देण्यात आल्या. काजल गुंडावार व अक्षय भास्करवार या नवदाम्पत्याने प्लॉस्टिक मुक्ती व पर्यावरण संरक्षणासाठी उपस्थितांना संदेश देऊन नवा आदर्श निर्माण केला.
ज्युट पिशव्यांचा लोकार्पण सोहळा व्यासपीठावर पार पडला. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रकांत गुंडावार, विशेष कार्याधिकारी विजय इंगोले, मुख्याधिकारी विनोद जाधव, अॅड.एम. रायपुरे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.