उकीरड्यावरच्या जीवनात उजळला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:24 AM2017-10-22T00:24:20+5:302017-10-22T00:24:32+5:30

समाजात आजही अनेक कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्या कुटुंबातील चिमुकले उकीरड्यावरील कचरा उचलून पोटाची खळगी भरतात.

Bright light in the life of the ecosystem | उकीरड्यावरच्या जीवनात उजळला प्रकाश

उकीरड्यावरच्या जीवनात उजळला प्रकाश

Next
ठळक मुद्देप्रेरणादायी उपक्रम : दिवाळीत दिला सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

अनेकश्वर मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : समाजात आजही अनेक कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्या कुटुंबातील चिमुकले उकीरड्यावरील कचरा उचलून पोटाची खळगी भरतात. हा समाज आजही दुर्लक्षित, उपेक्षित आहे. अशाच बालकांच्या जीवनात आनंद देत त्यांचे उकीरड्यावरचे जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य येथील श्री लक्ष्मी नृसिंह पतसंस्था व संत गाडगेबाबा वाचनालयाने केले आहे. त्यांनी ऐन दिवाळीत सामाजिक बांधिलकीचा परिचय देत राबविलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
दिवाळीत सर्वत्र हर्षोल्लासाचे वातावरण असते. नानाविध पदार्थांचा गोडवा प्रत्येकाच्या घरी असतो; मात्र परिस्थितीने हतबल झालेल्या व दारिद्रयात जीवन कंठत असलेल्या कुटुंबातील बालगोपाल या आनंदापासून दूर असतात. त्यांची सकाळ हातात पिशवी घेऊन सुरू होते. उकीरड्याचा शोध घेत प्लॉस्टिक व इतर वस्तू गोळा करण्याचा त्यांचा दिनक्रम नित्याचाच.
शहराच्या गल्लोगल्लीतून भटकंती करून कचºयातील प्लॉस्टिक व इतर वस्तू गोळा करायच्या आणि त्या विकून पोटाची खडगी भरायची. शिक्षणाच्या प्रवाहापासूनही ही बालके दूर असतात.
या चिमुकल्यांचा जीवनात एका दिवसापुरता का होईना, आनंद देण्याचा प्रयत्न येथील श्रीनिवास सुंचूवार यांनी केले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उकीरड्यावर कचरा वेचणाºया चिमुकल्यांना त्यांनी एकत्र आणले.
सामाजिक बांधिलकीतून या चिमुकल्यांना गोड घास भरविला. सर्व बालकांना नवे कपडे दिले. त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते त्यांना विविध उपयोगी साहित्य देण्यात आले.
श्री लक्ष्मी नृसिंह नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, डॉ. श्याम हिवरकर, रामजन्म चक्रवती, धीरज सुंचूवार, प्रकाश पवार, कुलदीप सुंचूवार, देवानंद रामटेके, रमेश चौधरी यांनी राबविलेला हा उपक्रम समाजात प्रेरणादायी ठरला आहे.

Web Title: Bright light in the life of the ecosystem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.