स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना चंद्रपुरात उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:32 AM2021-08-24T04:32:01+5:302021-08-24T04:32:01+5:30
चंद्रपूर : स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कारावासाची शिक्षा भोगालेल्या चंद्रपूर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व्हावे यासाठी येथील ...
चंद्रपूर : स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कारावासाची शिक्षा भोगालेल्या चंद्रपूर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व्हावे यासाठी येथील जटपुरा गेट परिसरात महात्मा गांधी पुतळा समोर ऐतिहासिक शिलालेख आहे. यावर स्वातंत्र्यसैनिकांची नावे कोरलेली आहे. हा इतिहास नव्या पिढींना कळावा, यासाठी येथील विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. विशेष म्हणजे, या शिलालेखावर लक्ष्मणराव दसरूजी काहिलकर आणि गोविंदराव दसरुजी काहिलकर अशा एकाच कुटुंबातील दोघांची नावे आहे.
येथे आयोजित कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मणराव काहिलकर यांची धर्मपत्नी विठाबाई काहिलकर, नगरसेवक पप्पू देशमुख, इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितीतांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर, संचालन संजीवनी कुबेर यांनी केले. यावेळी इकोप्रोचे सदस्य नितीन रामटेके, धर्मेशभाऊ लुणावत, सचिन धोत्रे यांची उपस्थिती होती. संस्थेचे सदस्य ओमप्रकाश मिसार, चेतन जनबंधु, राजू काहिलकर, भारती कश्यप, माधुरी काहिलकर, कीर्ती नगराळे, वैशाली बावणे, प्रीतम रागीट, सुषमा मोकळे, मंजूषा लोंढे, मिथिलेश काहिलकर, मैथिली काहिलकर
आदींनी परिश्रम घेतले.