दोषसिद्धीमध्ये जिल्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:00 AM2018-06-10T01:00:17+5:302018-06-10T01:00:17+5:30

पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना शासन करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. दोषसिद्धीमध्ये जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आहे. पोलीस प्रशासनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सोईसुविरधा उपलब्ध केल्या जात आहेत.

Bring the district to the first place in conviction | दोषसिद्धीमध्ये जिल्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचवा

दोषसिद्धीमध्ये जिल्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचवा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मूलमधून सायबर क्राईम जनजागृतीचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना शासन करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. दोषसिद्धीमध्ये जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आहे. पोलीस प्रशासनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सोईसुविरधा उपलब्ध केल्या जात आहेत. पोलीस दलामध्ये कार्यक्षमताही प्रचंड आहे. त्यामुळे आगामी काळात चंद्रपूर पोलीस प्रशासनाने दोषसिद्धीमध्ये जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर पोहोचवावे, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मूल येथील मा.सा. कन्नमवार स्मृती सभागृहामध्ये शुक्रवारी नागरी सुरक्षा दलाला सायकल वाटप तसेच पोलीस ठाण्यांना बॅरिकेट्स वाटप व सायबर क्राईम जनजागृती उपक्रमाची सुरुवात पोलीस प्रशासनाने केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत उपस्थित होते. मूल, राजुरा, गडचांदूर या भागासाठी मिळणाºया नक्षल निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जिल्हाभरातून आलेल्या नागरिक सुरक्षा समितीच्या सदस्यांना सायकल वाटप करून संबोधित केले. पोलीस विभागाला जिल्ह्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरी सुरक्षा दलामार्फत पोलिसांच्या कार्यक्षमतेत निश्चितच भर पडणार आहे. येणाºया काळामध्ये जिल्ह्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेºयाचे जाळे घट्ट केले जाईल. त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सुलभ होईल. महाराष्ट्राच्या पोलीस विभागातील ज्या काही अद्यावत सुविधा असतील, त्या सर्व चंद्रपूर पोलीस प्रशासनाला मिळेल, अशी ग्वाहीही ना. मुनगंटीवार यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमराज सिंह राजपूत यांनी तर संचालन पोलीस निरीक्षक विकास मुंडे यांनी केले.

चित्ररथाद्वारे सायबर जनजागृती
मोबाईलवर येणारे फसवे मेसेज, एटीएमवरून होणारी फसवणूक, बँकेच्या अकाऊंट संदर्भात मागितली जाणारी माहिती, महिला, बालके वरिष्ठ नागरिकांची मोबाईलवरून होणारी फसवणूक यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जनजागृतीला सुरुवात केली आहे. यासाठी एक सुसज्ज चित्ररथ तयार करण्यात आला असून यामध्ये अनेक माहितीपट दाखविले जाणार आहे. सोबतच जिल्हा पोलीस प्रशासनाने सायबर क्राईम जनजागृती संदर्भात मोठ्या प्रमाणात साहित्य तयार केले असून त्याचे वाटप सुद्धा ग्रामीण भागात केले जाणार आहे. यासंदर्भातील एका चित्ररथाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली.

Web Title: Bring the district to the first place in conviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.