सिंदेवाहीमार्गे ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:34+5:302021-08-01T04:25:34+5:30
सिंदेवाही : जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तालुक्यातील शहरात रेल्वेमार्ग असल्याने ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सिंदेवाहीमार्गे सुरू करावी, अशी मागणी तालुका ...
सिंदेवाही : जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तालुक्यातील शहरात रेल्वेमार्ग असल्याने ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सिंदेवाहीमार्गे सुरू करावी, अशी मागणी तालुका विकास संघर्ष समितीने केली आहे.
नागपूर येथून सुरू होणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रो शहराला जोडण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनव योजना आखलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सिंदेवाही शहरातून रेल्वे मार्ग जातो. देशात नितीन गडकरी यांनी प्रत्येक क्षेत्राचा विकास साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले आहेत. त्यानुसार नागपूर ब्राॅडगेज मेट्रो चंद्रपूरपर्यंत मंजूर करण्याचे कामही त्यांच्या हातून झाले आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असून विदर्भातील प्रमुख बाजारपेठ, शैक्षणिक, व्यापार व वैद्यकीय सुविधेच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. परिसरातून विविध कामांकरिता नागपूर येथे जाणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. वडसा- ब्रम्हपुरी - नागभीड - सिंदेवाही- मूल -चंद्रपूर या रेल्वे मार्गाने ब्रॉडगेज मेट्रोने वेळेची बचत आणि अंतरही कमी होईल. या दृष्टीकोनातून ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सिंदेवाहीमार्गे सुरू करावी, अशी मागणी तालुका विकास संघर्ष समितीने केली आहे.