सहा महिन्यांपासून तुटलेली ग्रील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:27 AM2021-03-06T04:27:39+5:302021-03-06T04:27:39+5:30
नगर परिषद म्हणते बांधकाम विभागाचे काम बल्लारपूर : पेपरमिलकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील वाघमारे किराणासमोर फुटी दिवाळीकडे जाणाऱ्या चौकात दुभाजकाची ...
नगर परिषद म्हणते बांधकाम विभागाचे काम
बल्लारपूर : पेपरमिलकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील वाघमारे किराणासमोर फुटी दिवाळीकडे जाणाऱ्या चौकात दुभाजकाची ग्रील व पुतळा तुटून सहा महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु दुरुस्ती होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नगर पालिकेवर संताप व्यक्त केला आहे.
शहरातून जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा ग्रील लावून पुतळे बसवून सौंदर्यीकरण केले आहे. परंतु बेफिकीर वाहन चालक हे सौंदर्य व दुभाजक तोडून नष्ट करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याचे फुटी दिवाळी चौकातील तरुण सांगतात. विशेष म्हणजे नगर परिषदेचे सभापती याच परिसरात राहतात. तरीही तुटलेली ग्रील दुरूस्तीसाठी सहा महिन्यांपासून वाट पाहावी लागत आहे.
यासंदर्भात सभापती अरुण वाघमारे यांनी सांगितले की, नगर परिषदेने पीडब्लूडीच्या बांधकाम विभागास कळवले आहे. मात्र, नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने ही दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी युवकांची मागणी आहे.