महागाई विरोधात बीआरएसपीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:39 PM2018-10-05T22:39:15+5:302018-10-05T22:39:44+5:30
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात विसापूर-बल्लारपूर टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी टोल नाक्यावर वाहतूक रोखून रस्त्यावर चूल पेटवून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात विसापूर-बल्लारपूर टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी टोल नाक्यावर वाहतूक रोखून रस्त्यावर चूल पेटवून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आले.
दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढत चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाकडून आश्वासने देण्यात आली. मात्र सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ केली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झाले आहे. महागाई कमी करावी, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संजय बोधे, विजय गोंडाने, वंदना तामगाडगे, माया मडावी, अजय लिहितकर, सपत कोरडे, झाकिर खान, अनुरुप पाटील उपस्थित होते.