बीआरएसपीचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:48 PM2017-11-20T23:48:05+5:302017-11-20T23:48:23+5:30
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा मोर्चा सोमवारी वरोरा तहसील कार्यालयावर धडकला.
आॅनलाईन लोकमत
वरोरा : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा मोर्चा सोमवारी वरोरा तहसील कार्यालयावर धडकला. शेतकरी, शेतमजूर, वर्धा पॉवर कंपनी व शहरातील अतिक्रमणधारक यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून विदर्भ सचिव भुपेंद्र रायपुरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात शेकडो नागरिकांचा समावेश होता. यावेळी प्रमुख मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार कोवे यांना देण्यात आले.
यात शेतमालाला हमी भाव देण्यात यावा, शेतीकरिता २४ तास वीज पुरवठा द्यावा, वरोरा तालुका भारनियमन मुक्त करावा, वीज बिलात आकारण्यात येणारे अनावश्यक कर रद्द करून माफक दरात वीज उपलब्ध करून द्यावी, रमाई आवास योजनेची योग्य अंबलबजावणी करावी, शहरातील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे, वर्धा पॉवर कंपनीमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य देऊन कायमस्वरूपी रुजू करावे आदी मागण्यांचा समावेश होता.
या मोर्चात जिल्हा उपाध्यक्ष अजय लिहितकर, तालुकाध्यक्ष राजू डांगे, संघटक जितू थुल, अॅड. विनोद हरले, आशिष मुन, योगिता भगत, अनिल झिलटे, कुंदन बुजाडे, सीमा तेलंग, अशोक भीमटे, सुजाता दुधे, राजकुमार कांबळे, रमण खातरकर, धर्मा जीवने, प्रज्ञा नळे, गौतम चिकाटे, प्रमोद पेटकर, सुमन कांबळे, पुरुषोत्तम वैद्य, विठोबा मुन, रामाजी हस्ते, अशोक गुजर, अमर साठे, महेंद्र तितरे, धनपाल मानकर, विजय हरले, राजू ताकसांडे आदींचा सहभाग होता.