बीएसएनएल लॅडलाईनचे ग्राहकांना मिळणार फक्त ई-बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:42 PM2018-12-30T22:42:30+5:302018-12-30T22:42:55+5:30
चंद्रपूर येथील दूरसंचार महाप्रबंधक कार्यालयाच्या पूर्णता पेपरलेस लँडलाईन सर्विसला सुरुवात झाली आहे. जानेवारी २०१९ पासून बिीएसएनएलकडून कोणत्याही ग्राहकाला छापील बिल जाणार नसून बिल प्राप्त करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी नोंद करण्याचे आवाहन या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर येथील दूरसंचार महाप्रबंधक कार्यालयाच्या पूर्णता पेपरलेस लँडलाईन सर्विसला सुरुवात झाली आहे. जानेवारी २०१९ पासून बिीएसएनएलकडून कोणत्याही ग्राहकाला छापील बिल जाणार नसून बिल प्राप्त करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी नोंद करण्याचे आवाहन या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
मोबाईल फोनच्या युगामध्ये घरात वापरण्यात येणाऱ्या वायरनी जोडलेला लॅन्डलाईन फोन मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मात्र तरीही इंटरनेटचा वापर आणि कार्यालयांमध्ये लैंडलाइनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कधीकाळी ६७ हजारांवर चंद्रपूर महानगरात होते.
मात्र आता ही संख्या १४ हजाराच्या आसपास आली आहे. पण सोबतच ब्रॉडबंड वापरणाºया ग्राहकांची संख्यादेखील वाढली आहे. आता या सर्व ग्राहकांना १ जानेवारी २०१९ पासून बीएसएनएलकडून पूर्णत: छापील बिल मिळणे बंद करण्यात आले आहे.
तथापि ग्राहकांची असुविधा होऊ नये, यासाठी ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी यावरून ही बिल प्राप्त करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या ग्राहकांकडे पोस्टपेड मोबाईल आहे. त्यांनी ई-मेल रजिस्टर करण्यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करून ५३३३३ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. तसेच वेबसाईटवर रजिस्टर करण्यासाठी कंपनीच्या संकेत स्थळाला भेट देणे आवश्यक आहे.
या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास बिएसएनएलच्या कार्यालयात संपर्क साधावा लागणार आहे.
ग्राहकांचे लॅन्डलाईन अथवा महत्वाच्या मोबाईलचे बिल आपल्या इमेलवर घेणाºया ग्राहकांना प्रत्येक महिन्याच्या बिलामध्ये दहा रुपयांची सवलतदेखील दिली जाईल. एक जानेवारीपासून ग्राहकांना छापील बिल न देता फक्त ई-मेलद्वारे बिल पाठवले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन बीएसएनएलचे मुख्य लेखाधिकारी के.जी.आयतुलवार यांनी केले आहे.