बीएसएनएलने ग्राहकाभिमुख सेवेवर भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:49 PM2018-01-12T23:49:42+5:302018-01-12T23:50:05+5:30
दूरसंचार यंत्रणा अधिक गतिमान व्हावी, तिला लोकाभिमुखतेची जोड मिळावी, यासाठी वरिष्ठांनी सहकारी अधिकारी व कर्मचाºयांच्या माध्यमातून प्रभावी कार्य करावे.
चंद्रपूर : दूरसंचार यंत्रणा अधिक गतिमान व्हावी, तिला लोकाभिमुखतेची जोड मिळावी, यासाठी वरिष्ठांनी सहकारी अधिकारी व कर्मचाºयांच्या माध्यमातून प्रभावी कार्य करावे. ग्राहकांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावरच निराकरण होईल, अशी व्यवस्था उभी करावी. भ्रमणध्वणी सेवेचे जाळे ग्रामीण क्षेत्रात पसरविण्याकरिता प्रलंबित योजनांचे कार्यान्वयन व्हावे. तसेच आधुनिक यंत्राणेचा लाभ सर्वच स्तरावर पोहचेल याची दक्षता घेत ग्राहकाभिमुख सेवेवर भर द्यावे, अशा सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत अधिकाºयांना दिले.
शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीला दूरसंचार विभागाचे महाप्रबंधक रविंद्र पाटील, उपमहाप्रबंधक कोजबे, भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत, दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य अविनाश राखुंडे, जि. प. सदस्य संजय गजपुरे, नागराज गेडाम, हरिष गेडाम तसेच दूरसंचार विभागाचे अधिकारी अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ग्राहकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. ग्रामीण भागात आॅनलाईन बँकींग सेवेसाठी दूरसंचार विभागाने दक्ष राहून शेतकरी तसेच ग्रामीण क्षेत्रातील व्यवसायी व नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी असेही ना. अहीर यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी महाप्रबंधक पाटील यांनी बीएसएनएलतर्फे राबविण्यात येणाºया विविध कार्य व कार्यक्रमाची माहिती सादर केली. चंद्रपूर एक्सचेंज अंतर्गत सर्वच केंद्रावर ३-जी सेवा कार्यान्वित असून येत्या दोन ते तीन महिन्यात सॉफ्टवेअर बदलवून ४-जी सेवा अपग्रेड केली जाणार असल्याचीही माहिती दिली. दूरसंचार विभाग अंतर्गत रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी यासाठी मुख्य महाप्रबंधक, मुंबई यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे पाटील यांनी बैठकीत सांगितले.