बीएसएनएलने ग्राहकाभिमुख दूरसंचार सेवा उपलब्ध करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:25 PM2017-09-20T23:25:33+5:302017-09-20T23:25:43+5:30

चंद्रपूर या औद्योगिक बहुल तसेच विकासदृष्ट्या प्रगत जिल्ह्यामध्ये भारत संचार निगम या शासकीय संचार सेवेला आधुनिकीकरणाची जोड द्यावी.

BSNL should provide customer oriented telecom services | बीएसएनएलने ग्राहकाभिमुख दूरसंचार सेवा उपलब्ध करावी

बीएसएनएलने ग्राहकाभिमुख दूरसंचार सेवा उपलब्ध करावी

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : आढावा बैठकीत अधिकाºयांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर या औद्योगिक बहुल तसेच विकासदृष्ट्या प्रगत जिल्ह्यामध्ये भारत संचार निगम या शासकीय संचार सेवेला आधुनिकीकरणाची जोड द्यावी. खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएल दूरध्वनी व भ्रमनध्वनी ग्राहकांना अद्ययावत, सुलभ सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रभावीपणे उपाय अंमलात आणून बीएसएनएलची सेवा लोकाभिमुख, ग्राहकाभिमुख होईल या दृष्टीने कर्तव्य पार पाडावे, अशा सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिकाºयांना दिले.
मंगळवारी ना. अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत भारत संचार निगम, चंद्रपुरचे महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी जिल्ह्यातील बीएसएनएल सेवेशी संबंधित अद्यावत माहितीचा गोषवारा सादर केला. ना. अहीर यांनी बीएसएनएल सेवेबद्दल ग्राहकांच्या सात्याने तक्रारी येत असल्याने त्या तक्रारीचे निवारण स्थानिक स्तरावरच करण्याचे निर्देश अधिकारी व कर्मचाºयांना दिले.
चंद्रपूर माध्यमिक स्वीचींग क्षेत्र (एसएसए) अंतर्गत बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, वरोरा या कमी अंतरावरील चार्जिंग क्षेत्रात (एसडीसीए) अंतर्भुत तालुक्यातील सर्व एक्सचेंजला ४-जी सेवा त्वरित संलग्न करण्यात यावी तसेच पोंभुर्णा, राजुरा, कोरपना या एक्सचेंज मध्ये इंटरनेट सेवा प्रभावित होत असल्याने सेवा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी आहेत.
या अडचणीमुळे या सर्व तालुक्यातील राष्ट्रीयीकृत, जिल्हा व खासगी बँक, पतसंस्थांचे व्यवहार प्रभावित होत आहे, याकडे लक्ष देवून सेवा सुरळीत करण्याचे निर्देश ना. अहीर यांनी यावेळी दिले. या बैठकीला वणी विधानसभा क्षेत्राचे आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, महाप्रबंधक अरविंद पाटील, उपमहाप्रबंधक कोजबे, जेटीओ मोबाईल व अन्य सेक्शनचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिक्त पदे भरण्यासाठी मंजुरी द्या
चंद्रपूर माध्यमिक स्वीचिंग क्षेत्राअंतर्गत जिल्ह्यात असलेल्या रिक्त पदांमुळे बीएसएनएल सेवेवर दूरगामी परिणाम होत आहे. त्याचा फ टका ग्राहक सेवेवर तसेच शासकीय कामकाजावर होत असल्याने जिल्हा कार्यालयाद्वारे वरीष्ठ अधिकाºयांकडे रिक्त पदे भरण्याकरिता नव्याने प्रस्ताव तयार करून मंजूरी मिळवून घ्यावी, अशा सुचनाही यावेळी ना. हंसराज अहीर यांनी बीएसएनएल अधिकाºयांना दिल्या.

Web Title: BSNL should provide customer oriented telecom services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.