बौद्ध बांधवांनी धम्माचे आचरण करावे - निरंजने
By admin | Published: July 15, 2015 01:21 AM2015-07-15T01:21:25+5:302015-07-15T01:21:25+5:30
बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करीत असताना अनेक अडचणी येतात. जनमानसाला त्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात.
चंद्रपूर : बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करीत असताना अनेक अडचणी येतात. जनमानसाला त्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. आता तरी समाजातील नागरिक आणि आंबेडकर अनुयायांनी स्वत:मध्ये बदल करायला हवा. त्यातून परिवर्तन घडेल, असे मत भाऊराव निरंजने शनिवारी वरोरा येथे व्यक्त केले. ते धम्म प्रबोधन मेळावा व ग्रंथ वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य विजय पिंपळशेंडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर वनकर, व्ही.डी. पाटील होते. सर्व प्रथम भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भूमिका बुद्ध धम्म प्रचार समितीचे जिल्हा प्रभारी भाऊराव निरंजने यांनी केले. संचालन अरुण देवगडे यांनी केले. आभार विजय हरले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनुमान येसांबरे, गौतम चिकाटे, रामाजी हस्ते, प्रा.के.एच.पाटील, भास्कर ठमके, अरुण देवगडे, विजय हरले, सुमन कांबळे, विजया पाटील, प्रेमचंद मंजूनकर, गुणाजी मेश्राम, शंकर भेले यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)